सोनुर्ली येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय सोनुर्ली येथील फेब्रुवारी/मार्च 2026 च्या वर्ग 10 वा आणि 12वी तील उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार 12 मे रोजी मंगळवारी करण्यात आला.
वर्ग 12 वी मध्ये लोकेश संतोष सोनटक्के 79.67% प्रथम,रितेश उत्तम आस्वले 67.83% व्दितीय तर खुशबू श्रीहरी तलमले 59% गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला.
आणि वर्ग 10 मध्ये आकांक्षा संदीप टोंगे 75.20% प्रथम, रुतुजा भिमराव तेलंग 74.40 % व्दितीय तर राशी विनोद तुराणकर 74 % तृतीय , पुनम अंगात मोरे 68.60% चतुर्थ तर नंदिनी पन्नालाल सोनी 67.80 %गुणांसह पाचवा क्रमांक पटकावला.
या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानी श्री. धनंजयराव गोरे (सचिव,ग.शि.प्र. मं.गडचांदुर व सदस्य शा. स.), होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. विकासराव भोजेकर (उपाध्यक्ष, ग.शि. प्र.मं .गडचांदुर व सदस्य शा स) यांच्या हस्ते व श्री धम्मकिर्तीजी कापसे (उपाध्यक्ष शि-पा. संघ) यादवराव खिरवटकर (सदस्य शि-पा संघ) यांच्या उपस्थितीत पार पडला. सन्मानिय महोदयांनी अभिनंदनपर पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या ,मोलाचं मार्गदर्शन केले. तसेच परिसरात आपल्या विद्यालयाची प्रगत वाटचाल कायम विद्यार्थ्यी सर्वोच्च यश कसा प्राप्त करेल याचे मार्गदर्शन केले. यावेळी सर्वश्री. संतोष सोनटक्के, संदीप टोंगे ,विनोद तुराणकर , उत्तम आस्वले, अंगद मोरे ,सौ सुनीता सोनी सौ संघमित्रा तेलंग इत्यादी पालक उपस्थित होते.
तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री बबनराव भोयर, येडमे सर, धोटे सर, कुंभारे सर, सोनपितरे सर, मडावी सर , तामगाडगे मॅडम ,कुरेशी मॅडम , भोगेकर सर ,प्रभाकर काकडे निखिल काकडे इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.सत्कार सोहळ्याचे यशस्वी सूत्रसंचालन श्री. पत्रकार सर यांनी केले



