अवैद्य दारू विक्रीवर सावंगी मेघे पोलीसांची धडक कार्यवाही
एकूण 71 हजार 900 रूपयाचा मुद्देमाल जप्त
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस स्टेशन सावंगी मेघे पोलीसांची धडक कार्यवाही सावंगी (मेघे) पोलीस हे पो स्टे परीसरात पेट्रोलींग करीत असताना मुखबिर कडुन खबर मिळाली की, ईंजापुर येथे वर्धा ते वायगाव निपानी कडे जाणा-या रोडचे डावे बाजुस असलेले हॉटेल कशीश रेस्टॉरंट मध्ये अवैद्यरित्या देशी विदेशी दारूची विक्री सुरू असुन ग्राहकाना टेबल खुर्चीवर बसवुन दारू पिण्या करीता व्यवस्था केलेली आहे अशा खबरेवरून आम्ही पंच व पो स्टॉफसह त्यांचेवर प्रोरेड केला असता, शंकर दानानी याला पोलीस आल्याची चाहुल लागताच तो मागील दाराने पळुन गेला. पंचासमक्ष हॉटेलची पाहणी केली असता, हॉलचे बाजुला असलेल्या एका खोलीत दोन प्लॉस्टीक टेबल लावुन असलेले दिसुन आले टेबलचे भोवताल चार प्लॉस्टीक खुर्ची लावुन असलेल्या दिसुन आल्या. दोन टेबलचे बाजुला लागुन असलेल्या खुर्चीवर तीन लोक बसुन दिसुन आले टेबल वर ऑफीसर चॉईस कंम्पनीच्या 180 एम.एल.च्या विदेशी दारूची शिशी दिसुन आली. स्टील ग्लॉस मध्ये विदेशी दारूमध्ये पाणी टाकलेले दिसुन आले. असता मौक्यावरून 1) ऑफीसर चॉईस कंपनीची 180 एम एल च्या विदेशी दारूने भरलेल्या 12 सिलबंद शिशा प्रती शिशी 300/- रू प्रमाणे 3600/- रू. 2) कींगफीशर कम्पनीच्या 500 एम.एल.च्या 02 सिलबंद बिअर कॅन प्रती कॅन 400/- रू प्रमाणे 800/- रू. 03) 03 स्टील ग्लॉस प्रती ग्लास किंमत 100/-रू, प्रमाणे 300/-रुपये 04) जुन्या वापरत्या पीवळट रंगाच्या 04 प्लॉस्टीक खुर्ची प्रती खुर्ची 800/- रू प्रमाणे 3200/- रू. 05) जुने वापरते दोन प्लॉस्टीक टेबल प्रती टेबल 2,000/- रू प्रमाणे 4,000/- रू. 06) एक जुना वापरता ईंडो वेस्टर्न रेफरन्स प्रायवेट लीमीटेड कंम्पनीचा फ्रीज अंदाजे किंमत 60,000/-रू, असा एकुण जुमला किंमत 71900/-रू चा मुद्देमाल मिळुन आल्याने मौका जप्ती पंचनामा कार्यवाही करून नमुद आरोपी 1) शंकर दानानी रा. पोद्दार बगीचा रामनगर ता.जी. वर्धा (पसार) 2) राहुल अरुणराव बोरले वय 38 वर्ष रा ईंजापुर ता जी वर्धा 3) सुनील देवेद्रकुमार बहल वय 44 वर्ष रा रामनगर ता जी वर्धा 4) प्रविण चिंधुजी कांबळे वय 44 वर्ष रा समतानगर वर्धा यांचेविरूध्द लेखी फिर्याद वरून सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. सदाशिव वाघमारे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा श्री. प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथील ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज वाघोडे, पोहवा अभय खोब्रागडे व.नं 274, पोशी शाम सलामे ब.नं 1654, पोशी गौरव नरताम व न 681, मपोशी अंजली गाडेकर वं नं 432 सर्व नेमुणकीस पोलीस स्टेशन सावंगी मेघे यांनी केली आहे.


