चंद्रपूरातील युवकांसाठी जर्मनीमध्ये करियरची संधी
१४ मे रोजी ऑनलाईन वेबीनारचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
महाराष्ट्र शासनाचा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि ‘मॅजिक बिलियन’ कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भातील तरुणांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी एका विशेष ऑनलॉइन वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. ‘जर्मनीमध्ये करिअर करण्याची सुवर्णसंधी’ या विषयावर १४ मे २०२६ रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत हे मार्गदर्शन सत्र पार पडणार आहे.
या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट, चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांना जर्मनीमधील रोजगाराच्या संधीची माहिती देणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणे, हे आहे. तांत्रिक कौशल्य असलेल्या ग्रामीण भागातील तरुणांना जागतिक स्तरावर करिअरची संधी खुली व्हावी, यासाठी शासन स्तरावरून हा प्रयत्न केला जात आहे.
या वेबिनारमध्ये आयटीआय किंवा कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी, रोजगाराच्या शोधात असलेले इच्छुक उमेदवार, तांत्रिक कौशल्य असलेले युवक सहभागी होऊ शकतात. उमेदवारांना सहभागी होण्यासाठी ‘Google Meet’ ची लिंक https://meet.google.com/mqp-wyad-nbo उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच, अर्जासाठी दिलेल्या Google form https://forms.gle/tgiFD-Tog६DR४५CqN९ लिंकद्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे.
जास्तीत जास्त उमेदवारांनी या संधी लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी १७१७२_२५२२९२ या दूरध्वनी क्रमांकावर तसेच या कार्यालयाशी संपर्क करावा.



