ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“स्थानिक गुन्हे शाखे तर्फे पो. स्टे. रामनगर हद्दीतील हॉटेल शिवम येथे दारूबंदी कायद्यान्वाये रेड

एकूण 76 हजार 250 रु. चा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 09.05.2026 रोजी पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांचे सह एक पथक वर्धा शहर परिसरात अवैद्य धंद्यांवर कारवाई करता पेट्रोलिंग करत असता, खात्रीशीर माहिती मिळाली की, आर्वी रोड वरील हॉटेल शिवम चा मालक नितीन पडोळे हा आपले हॉटेलमध्ये अवैद्यरित्या देशी-विदेशी दारू विक्री करीत आहे तसेच ग्राहकांना दारू पिणे करता सर्व सुविधा उपलब्ध करून देत आहे. त्यावरून पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांचे सह एक पथक वर्धा येथून हॉटेल शिवम येथे रवाना होऊन सदर हॉटेल घेराव करून, सदर हॉटेलमध्ये आत जाऊन पाहिले असता, काउंटर वर मॅनेजर दारू विक्री करताना हजर मिळून आला.

तर हॉटेलमधील मागील हॉलमध्ये एका टेबलवर एकूण 03 आरोपी बसून दिसून आले व टेबलवर विदेशी दारू च्या बॉटल, ग्लासमध्ये विदेशी दारू, पाणी बॉटल ठेवलेले दिसून आले व टेबलवर बसलेले ग्राहक दारू पिताना हजर मिळून आले व या सर्व सुविधा त्यांना उपलब्ध करून देण्याकरता एक नोकर तेथे हजर मिळून आले . त्या सर्वांचे त्यांची नावे विचारले असता त्यांनी आपले नाव अनुक्रमे 1) नितेश महादेव शिरभाते वय 21 वर्ष, रा. तिगाव ता. जि. वर्धा

 2) कुंदन नाथुजी करणे वय 59 वर्ष, रा. पवनार, ता. जि. वर्धा,

3) दर्शन रमेश ठोके वय 30 वर्ष, रा. केळकर वाडी, वर्धा

4) रोहित राजेंद्र सावरे वय 30 वर्ष डॉक्टर कॉलनी सेवाग्राम जि. वर्धा

5) मनोज कवडुजी सायम वय 46 वर्ष रा.त्रिमूर्तीनगर वर्धा, ता. जि. वर्धा असे सांगितले वरून मॅनेजर नितेश शिरभाते याचे समक्ष सदर हॉटेलची झडती घेतली असता, हॉटेलमध्ये देशी-विदेशी व बियर दारूचा जुमला किंमत 3,750/ रुपयाचा मुद्देमाल मिळून आला. तसेच बियर दारूचा मुद्देमाल थंड करणे करता वापरलेला डिप फ्रिजर किंमत 30,000/रुपये,

06 स्टील ग्लास की. 100/- रू, दोन स्टील जार किंमत 400/ रुपये, तसेच हॉटेलमध्ये ग्राहकांना बसण्याकरता वापरण्यात आलेल्या 28 लोखंडी चेअर की.28,000/- रू, सात लोखंडी टेबल की. 14,000/- रू, असा एकुण जु.कि. 76,250/- रू. चा मुद्देमाल जप्त करून नमूद 5 आरोपी हॉटेल मालक नितीन पडोळे यांचे विरुद्ध पो.स्टे. रामनगर येथे दारू चा गुथ्था चालविल्या संबंधाने दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधिक्षक श्री सदाशिव वाघमारे, यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोलीस उप निरीक्षक राहुल इटेकार, पोलिस अंमलदार सचिन इंगोले, प्रमोद पिसे, अरविंद इंगोले, अमोल नगराळे,राहुल अधवाल, शुभम राऊत, सर्व नेमणूक स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा* यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये