ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैध दारुविक्रेत्यांवर जिल्हा पोलीसांची “वॉशआऊट” मोहीम

गुन्ह्यांत एकूण 1 कोटी 69 लक्ष 23 हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

जिल्ह्यात अवैध दारूविक्री आणि निर्मितीच्या साखळीवर पूर्णपणे आळा घालण्यासाठी वर्धा पोलीस दलाने काल दि. 06/05/2026 ते 08/05/2026 रोजी दरम्यान एक भव्य आणि अत्यंत नियोजनबद्ध ‘वॉशआऊट’ मोहीम यशस्वीरित्या राबविली. या धडक कारवाईत जिल्ह्यामध्ये 68 अवैद्य देशी/विदेशी दारू विक्रीचे गुन्हे तसेच 161 गावठी दारू विक्रीचे असे एकूण 229 गुन्हे दाखल करण्यात आले असून, सुमारे 01,69,23,750 रुपयांचा दारूसाठा आणि संबंधित मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला आहे.

श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, वर्धा यांनी संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेऊन या ‘वॉशआऊट मोहीम’ची योजना आखली. जिल्ह्यातील अवैध दारूविक्रेते मोठ्या प्रमाणावर दारू गाळून ती मोठ्या प्रमाणात तयार करून त्याचा साठा साठवून ठेवत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर मागील पाच ते सहा दिवसांपासून अवैध दारूभट्ट्यांच्या ठिकाणी, विशेषतः शहरालगतचा परिसर तसेच गावाबाहेर, जंगल शिवारात आणि जाण्या-येण्यास अडचणीच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करून गोपनीय पाळत ठेवण्यात आली. त्याच प्रमाणे बाहेरील जिल्ह्यातून चोरट्या मार्गाने विक्रीस येणारी देशी विदेशी दारू विक्री करणारे आणि ती विकण्याच्या ठिकाणावर पाळत ठेवण्यात आली.

पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली अपर पोलिस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यांतील 4 उपविभागीय पोलीस अधिकारी, 57 अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा व इतर शाखांचे असे एकूण 270 पोलीस अंमलदार यांची 19 पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळी पथके तयार करण्यात आली.

दि. 06/05/2026 च्या पहाटे 04.00 वाजल्यापासून या सर्व गावठी दारूभट्टीची ठिकाणे आणि देशी विदेशी दारूची विक्री करण्याच्या ठिकाणावर एकाच वेळी छापेमारी करण्यात आली. या कारवाईत एकूण 272 आरोपींवर 229 गुन्हे दाखल करण्यात आले.

भविष्यातील कठोर कारवाईचे संकेत

या अचानक केलेल्या ‘वॉशआऊट “मोहिमेमुळे अवैध दारू तयार करणारे, पुरवठादार आणि विक्रेते यांचे धाबे दणाणले आहेत. पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत की, “वर्धा जिल्ह्यात अवैध दारूचे कोणतेही प्रकार चालणार नाहीत. जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि दारू विक्रेत्यांकडून कोणताही व्यत्यय येऊ नये म्हणून अशा प्रकारची अचानक कारवाई (वॉशआऊट मोहीम) करण्यात आली आहे.”

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये