ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मारेगांवच्या हेमंत भुजाडेची CAPF परिक्षेत देशात 276 वी झेप

असिस्टंट कमांडंट पदी निवड, हंसराज अहीर यांचे हस्ते शाल-श्रीफळ देऊन सत्कार

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर/यवतमाळ :- प्रतिकूल आर्थिक परिस्थितीअडचणी आणि संघर्षावर जिद्दमेहनत व आत्मविश्वासाच्या बळावर मात करत मारेगांव येथील हेमंत लता शंकर भुजाडे याने केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत घेण्यात येणाऱ्या CAPF परिक्षेत देशात 276 वा क्रमांक मिळवत असिस्टंट कमांडंट पदावर मजल मारली आहे. हेमंतच्या या यशाची दखल घेत पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह त्याच्या घरी जाऊन भेट घेतली.

 यावेळी हंसराज अहीर यांच्या हस्ते हेमंतचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्याचा कुटुंबीयांचे अभिनंदन करून देशसेवेच्या नव्या जबाबदारीसाठी हेमंतला पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

हेमंतच्या यशाचे कौतुक करत हंसराज अहीर यांनी म्हटले कीप्रतिकुल परिस्थितीवर मात करून हेमंतने मिळविलेले यश हे त्याच्या जिद्दीचेमेहनतीचे आणि आत्मविश्वासाचे फलित आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता असूनयोग्य संधी आणि मार्गदर्शन मिळाल्यास ते राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करून शकतात.

देशाच्या सुरक्षेची जबाबदारी स्वीकारण्याची संधी मिळणे ही अभिमानाची बाब असल्याचे सांगत अहीर यांनी हेमंतला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. हेमंतने आपल्या कर्तृत्वातून मारेगांवचे नाव देशपातळीवर पोहोचविले आहे. त्याचा आदर्श घेऊन परिसरातील युवकांनी स्पर्धा परिक्षांकडे सकारात्मक दृश्टीकोनातून पाहावेअसे आवाहनही हंसराज अहीर यांनी केले. यावेळी दिनकर पावडेअविनाश लांबटप्रशांत नांदेअनुप महाकुलकरभाजपा पदाधिकारीकार्यकर्ते व मारेगांव येथील नागरिकांची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये