ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी कॉलेजमध्ये विश्व आदिवासी दिवस साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरटकर

गडचांदूर :- महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स, गडचांदूर येथे विश्व आदिवासी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी आदिवासी समाजाचे महान क्रांतिकारक बाबुराव शेडमाके व वीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. अनिस खान सर तसेच IQAC समन्वयक डॉ. रामकृष्णपटले यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी विश्व आदिवासी दिवसाचे महत्त्व सांगून आदिवासी समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक योगदानावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे ग्रंथपाल तथा कार्यक्रमाचे आयोजक डॉ. मनोहर बांद्रे यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी विश्व आदिवासी दिवसाचे महत्त्व सांगून आदिवासी समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक योगदानावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे ग्रंथपाल तथा कार्यक्रमाचे आयोजक डॉ. मनोहर बांद्रे यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये