ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मेश्राम लेआउटमध्ये CSR निधीतून वॉटर एटीएमचे भूमिपूजन!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदूर :_ मेश्राम लेआउट, प्रभाग क्र. १ येथील हनुमान मंदिर परिसरातील नागरिकांना स्वच्छ, शुद्ध व सहज उपलब्ध पिण्याचे पाणी मिळावे, या उद्देशाने दी आदित्य बिर्ला सेंटर फॉर कम्युनिटी इनिशिएटिव्ह अँड रुरल डेव्हलपमेंट आणि अल्ट्राटेक सिमेंट वर्क्स यांच्या CSR उपक्रमांतर्गत वॉटर एटीएमचे भूमिपूजन करण्यात आले.

हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर परिसरातील नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा जवळच उपलब्ध होणार असून, त्याचा थेट फायदा महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले तसेच संपूर्ण परिसरातील नागरिकांना होणार आहे. या सुविधेमुळे सार्वजनिक आरोग्य आणि दैनंदिन जीवनमान सुधारण्यास निश्चितच मदत होईल.

भूमिपूजनानंतर परिसरातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या व गरजा जाणून घेतल्या. नागरिकांनी मांडलेल्या विविध प्रश्नांबाबत संबंधित नगरपरिषद प्रशासनाला आवश्यक त्या सुधारणा व कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्यात.

यावेळी माझ्यासमवेत उपनगराध्यक्ष संजूभाऊ मेंढी, बांधकाम सभापती रामसेवकभाऊ मोरे, नगरसेवक महेशभाऊ आवारी, सुरेशजी मेश्राम, नगरसेविका सारिका डोर्लीकर, अश्विनीताई कांबळे, प्रणिताताई उपाध्ये, मनिषाताई परचाके, तसेच माणिकगड युनिट हेड श्री. नवीन कौशिक, तसेच संजूभाऊ शेरकी, कुणाल पारखी व परिसरातील नागरिक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गडचांदूर नगरपरिषद आणि CSRच्या सहकार्याने राबविण्यात येणारा हा उपक्रम केवळ पाण्याची सुविधा निर्माण करणारा नसून, नागरिकांच्या मूलभूत गरजा, सार्वजनिक आरोग्य आणि सर्वसमावेशक विकासाला प्राधान्य देणारा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.नागरिकांच्या गरजा समजून घेत, त्यांच्या सहभागातून आणि सहकार्याने गडचांदूरच्या विकासाची वाटचाल अशीच पुढे सुरू राहील.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये