पो.स्टे.वर्धा शहर गुन्हे पथकाची कार्यवाही
अनेक गुन्हे असलेला आरोपी अटकेत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक रोजी पोलीस स्टेशन वर्धा शहरचे पोलिस निरीक्षक संतोष ताले यांचे आदेशाने कोम्बिंग ऑपेरेशन दरम्यान पोहवा महेंद्र पाटील /523,पोहवा विवेक बनसोड /237 पोहवा अभिजित वाघमारे /1416 पोशी रंजित भुरसे /1717, पोशी अमोल साळवण/970 असे पोस्टे परिसरात पेट्रोलिंग करीत असताना मुखबीर द्वारे खबर मिळाली कि एक इसम मच्छी बाजार जवळ सार्वजनिक ठिकाणी आपल्या हातात धारदार तलवार घेऊन लोकांना धाक दाखवून दहशत निर्माण करीत आहे.

अशा खबरे वरून इतवारा बाजार वर्धा येथे हजर येऊन पंचासमक्ष आरोपीस ताब्यात घेऊन अंग झडती घेतली असता त्याचे कंबरेला लोखंडी धारदार तलवार मिळून आली.आरोपी विरुद्ध पोस्टे वर्धा शहर अप क्र. 580/26 कलम 4,25 भा.ह.का.अटक आरोपीचे नाव – रुपेश घनश्याम उईके वय 23 वर्ष रा.बुरड मोहल्ला,इतवारा,वर्धा
मिळालेला मुद्देमाल – 1) एक लोखंडी धारदार तलवार किंमत अंदाजे 1000/-रु.अशी मिळून आल्याने पुढील कारवाही करण्यात आली.सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक वर्धा, श्री.सौरभ अग्रवाल अपर पोलीस अधीक्षक वर्धा, श्री. सदाशिव वाधमारे उपविभागीय पोलीस अधीकारी वर्धा श्री. प्रमोद मकेश्वर तसेच ठाणेदार पोलीस स्टेशन वर्धा शहर श्री.संतोष ताले यांचे नि्देशनुसार पोलीस ठाणे वर्धा शहर येथील गु न्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस हवालदार महेंद्र पाटील ब.क.523,पोलीस हवालदार विवेक बनसोड ब क्र. 237,पोलीस हवालदार अभिजित वाघमारे ब.क्र.1416, पोलीस अंमलदार रंजित भुरसे ब.क्र.1717, पोलीस अंमलदार अमोल सालवन ब.क़.970 यांनी केला आहे.



