ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गडचिरोलीचे श्रीगुरुदेव व्यायाम शिक्षण व सेवा मंडळ ग्रामजयंती पुरस्काराने सन्मानित 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

      श्रीगुरुदेव सेवा मंडळ नागपूरच्या वतीने श्री गुरुदेव सेवाश्रमाच्या सभागृहात ग्रामजयंती पुरस्काराचे वितरण करण्यात आले. दरवर्षी प्रमाणे यंदाही ग्रामजयंती निमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांच्या कार्याचा गौरव ग्रामजयंती पुरस्कार देऊन आ. प्रवीण दटके, विधानपरिषद सदस्य आ.अभिजीत वंजारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. अध्यक्षस्थानी सेवाश्रमाचे अध्यक्ष एड. अशोक यावले होते तर पुरोगामी विचारवंत देविदास घोडेस्वार, नगरसेवक कांचन चव्हाण , सेवाश्रमाचे सचिव श्री. विठ्ठल पुनसे, सियाराम चावके, राष्ट्रसंत अभ्यास मंडळाचे दिलीप सुरकार, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर आदींची उपस्थिती होती. गडचिरोली येथील श्री गुरुदेव व्यायाम शिक्षण व सेवा मंडळ दिवंगत थोर समाजसेवी कर्मयोगी डॉ. शिवनाथजी कुंभारे यांच्या प्रेरणेने गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी व दुर्गम भागात शिक्षण , संस्कार वर्ग , आरोग्य शिबिराचे आयोजन करीत आहेत. श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून ग्रामगीता प्रणित ग्रामसुधारणावादी, विवेकवादी, सेवा कार्याचा प्रचार प्रसार करीत आहे. सदर संस्थेच्या वतीने गडचिरोली येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य विचारकृती संमेलन आयोजित करण्यात आले होते. पुरस्कार संस्थेच्या वतीने ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी स्विकारला. आ. दटके आणि आ. वंजारी यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्याची प्रासंगिकता यावर प्रकाश टाकून राष्ट्रसंताच्या कार्याचा प्रचार प्रसार करणा-या संस्थेचे कौतुक केले.ग्राम. बंडोपंत बोढेकर यांनीही यावेळी चंद्रपूर व गडचिरोली येथील राष्ट्रसंतांच्या विचारानुरूप कार्य करणाऱ्या संस्थांची माहिती दिली. देविदास घोडेस्वार यांनी भारतीय संविधान आणि ग्रामगीता या ग्रंथातील मौलिकता व साम्यता यावर प्रकाश टाकला. यावेळी राष्ट्रसंत साहित्य विचार प्रसार सेवा पुरस्कार (संस्था – शहर विभाग) राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद, चंद्रपूर यांना सन्मानित करण्यात आले तर

   संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल संगीतरत्न अन्नाजी माहुलकर स्मृती पुरस्कार श्री . प्रमोद पोकळे, बडनेरा (प्रयोगशील संगीतकार) यांना प्रदान करण्यात आला. तसेच आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार-आदर्श ग्रामपंचायत कवठा (म्हसाळा) यांना देण्यात आला आहे. सूत्रसंचालन राजेश कुंभलकर यांनी केले तर आभार प्रदर्शन राष्ट्रसंत साहित्य अभ्यास मंडळाचे दिलीप सुरकार गुरुजी नागपूर यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये