ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हॉटेलवर छापा, 17 आरोपी ताब्यात; 1.56 लाखांचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा : स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांच्या पथकाने सावंगी मेघे हद्दीतील वायगाव निपाणी परिसरातील बालाजी फॅमिली रेस्टॉरंटवर धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत हॉटेलमधील अवैध कृत्यांवर अंकुश ठेवत 17 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून एकूण 1,56,850 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक श्री. सौरभकुमार अग्रवाल यांच्या आदेशानुसार 05 मे 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. संबंधित हॉटेलमध्ये अवैध दारू विक्री व इतर गैरप्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून हॉटेलमध्ये चालणारे प्रकार उघडकीस आणले.

कारवाईदरम्यान पोलिसांना हॉटेलमधून विदेशी व देशी दारू, बिअर तसेच हुक्का साहित्य आढळून आले. यात विविध ब्रँडच्या दारूच्या बाटल्या, बिअर, हुक्का फ्लेवर, मोबाइल फोन, प्लास्टिक ग्लास व इतर साहित्य जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 1,56,850 रुपये इतकी आहे.

या प्रकरणी हॉटेल मालक किरण कामडी याच्यासह एकूण 17 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई सुरू आहे. तसेच बालकामगार आढळल्याने बालकामगार प्रतिबंधक कायद्याअंतर्गतही गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक चौधरी, पोलीस उपनिरीक्षक राहुल इटकर, पोलीस अंमलदार नरेंद्र परशार सचिन इंगोले, प्रमोद पिसे , अमोल नगराळे अरविंद इंगोले , राहुल अधवाल मिथुन जिचकार, दीपक साठे , प्रफुल पुनवटकर आदींच्या पथकाने पार पाडली.

दरम्यान, अवैध दारू विक्री किंवा तत्सम गैरप्रकारांची माहिती नागरिकांनी तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक श्री. सौरभकुमार अग्रवाल यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये