अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या आरोपीस अत्यंत शिताफीने ताब्यात घेऊन अटक
पिडीत मुलीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
विवरण याप्रमाणे आहे की यातील फिर्यादीने पोलीस स्टेशन दहेगाव येथे तोंडी रिपोर्ट दिला की, त्यांची अल्पवयीन मुलगी वय अंदाजे 17 वर्षे हिला कोणीतरी अज्ञात इसमाने फूस लावुन पळवून नेले. अशा दि 09/11/2025 ला फिर्यादीच्या दिलेल्या रिपोर्ट वरून पो. स्टे. दहेगाव येथे अप क्र.302/2025 कलम 137(2)BNS प्रमाणे गुन्हा नोंद करुन तपासात घेतला. गुन्हयातील पिडीत मुलीचा व आरोपीचा शोध न लागल्याने सदरच्या गुन्हात कमल 134(4)BNS प्रमाणे वाढ करुन सदरचा गुन्हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे वर्ग करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास मा. श्री सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक वर्धा यांनी दिलेल्या विशेष सूचना व निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा तथा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, वर्धा यांचे मार्गदर्शनात पथक तयार करण्यात आले.
सदर गुन्ह्यात खात्रीशीर मुखबिर लावून व तांत्रिक तपास करण्यात आला. त्या अनुषंगाने आरोपीची व पिडीत मुली बाबत संपूर्ण माहिती संकलित करण्यात आली असता आरोपी व पिडीत मुलगी हे हातकणंगले जि.कोल्हापुर येथून ट्रॅव्हल्स ने वर्धेकरता येत असल्याची गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाल्याने रेल्वे स्टेशन व बस स्टॉप वर्धा येथे सापळा रचून त्यांना ताब्यात घेऊन आरोपी आकाश दिवाकर तडस वय 31 वर्षे रा.घोराड त. सेलु यास सदर गुन्ह्यात रीतसर कायद्याप्रमाणे अटक करून गुन्हातील अल्पवयीन पिडीत मुलगी वय 17 वर्षे हिला तिचे पालकांचे ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास पो. स्टे. दहेगाव करीत आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी स्थानिक गुन्हे शाखा तथा, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, वर्धा यांचे मार्गदर्शनात स.फौ. सुभाष राऊत, अमर लाखे, चंद्रकांत बुरंगे, नितेश मेश्राम, म.पो.हवा. शबाना शेख, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, वर्धा यांनी केली.



