भाजपाच्या विजयाचा देऊळगाव राजात जल्लोष; कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पश्चिम बंगाल-आसाम विजयाचा आनंद; भाजप कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतषबाजी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा : पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुच्चेरी (पाँडिचेरी) येथील निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर देऊळगाव राजा शहरात भाजप कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त जल्लोष साजरा केला. स्थानिक बसस्थानक चौकात फटाक्यांची आतषबाजी करून विजयाचा आनंद व्यक्त करण्यात आला.
या विजयाकडे भाजप कार्यकर्त्यांनी जनतेचा वाढता विश्वास आणि पक्षाच्या धोरणांना मिळालेला पाठिंबा म्हणून पाहिले जात आहे. राष्ट्रीय पातळीवरील या यशामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी राजकीय वाटचालीसाठी आत्मविश्वास वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.यावेळी भाजप युवक नेते संचित धन्नावत यांनी उपस्थितांना कुरमुरे वाटप करून आनंदोत्सव साजरा केला. कार्यक्रमात पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मांटे, डॉ. सुनील कायंदे, सविताताई पाटील, डॉ. शंकर तलबे, निशिकांत भावसार, नगरपरिषद उपाध्यक्ष वनिता राजेश भुतडा, नगरसेविका अलका धन्नावत, संचित धन्नावत, राजेश भुतडा, संजय तिडके, सुजित गुंडे, ॲड. भाला, दादाजमन व्यवहारे, उदय छाजेड, श्याम बनकर, सूरज हनुमंते, ओमकार बनसिले, आदित्य पाटील, संजय इलक, निशान सोमवंशी, संदीप गावंडे, ॲड. श्याम खैरे, गजानन वाघमारे, योगेश खांडेभराड आदी उपस्थित होते. राष्ट्रीय पातळीवरील निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर देऊळगाव राजातील भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेला हा जल्लोष स्थानिक राजकारणातही नव्या घडामोडींचे संकेत देणारा ठरत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे..



