ब्रह्मपुरीत रंगणार ‘संघ गंगा के तीन भगीरथ’ नाटकाचा भव्य प्रयोग

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी :- येथील सांस्कृतिक चळवळीला गती देण्यासाठी आणि राष्ट्रीय विचारांचा जागर करण्यासाठी ताराराणी फाउंडेशन (नागपूर-पुणे) आणि ब्रह्मपुरी अर्बन सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने एका विशेष नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, संघाच्या पहिल्या तीन सरसंघचालकांच्या जीवनकार्यावर आधारित ‘संघ गंगा के तीन भगीरथ’ हे भव्य द्विअंकी हिंदी नाटक ब्रह्मपुरीकरांच्या भेटीला येत आहे.
ऐतिहासिक आणि प्रेरणादायी कथानक हे नाटक केवळ एक कलाकृती नसून, राष्ट्रनिर्मितीसाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या तीन महान राष्ट्रपुरुषांच्या संघर्षाची गाथा आहे. संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार, द्वितीय सरसंघचालक श्री. गोळवलकर गुरुजी आणि तृतीय सरसंघचालक श्री. बाळासाहेब देवरस या तीन ‘भगीरथांनी’ ज्याप्रमाणे निष्ठेने आणि कष्टाने संघकार्य वाढवले, त्याचा प्रभावी चित्रण या नाटकात पाहायला मिळेल.दिग्गज कलावंतांचा सहभागया नाटकाचे लेखन प्रसिद्ध लेखक श्रीधर गाडगे यांनी केले असून, दिग्दर्शन संजय पेंडसे यांनी केले आहे. नाटकाची निर्मिती सारिका पेंडसे यांची असून, नेपथ्य सतीश पेंडसे यांनी सांभाळले आहे. डॉ. भाग्यश्री चिटणीस यांनी या नाटकाला संगीतबद्ध केले असून, त्यातून एक भावस्पर्शी अनुभव प्रेक्षकांना मिळणार आहे.
हा कार्यक्रम शनिवार, ९ मे २०२६ रोजी सायंकाळी ७:०० वाजता, ने. ही. महाविद्यालय, ब्रह्मपुरी येथील सभागृहात संपन्न होईल. विशेष म्हणजे हा प्रयोग सर्व नागरिकांसाठी पूर्णतः मोफत आहे. तरीही आसन व्यवस्था मर्यादित असल्याने प्रेक्षकांनी आपल्या प्रवेशिका आधीच प्राप्त करून घेणे आवश्यक
कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका ‘ब्रह्मपुरी अर्बन को-ऑप बँक, ब्रह्मपुरी’ येथे उपलब्ध आहेत.
ब्रह्मपुरीतील जास्तीत जास्त राष्ट्रप्रेमी आणि रसिक नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन नाटकाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे मनापासून आवाहन ब्रह्मपुरी अर्बन सेवा प्रतिष्ठान आणि आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.



