ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एक तास माझ्या शाळेसाठी माजी विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी उपक्रम

माजी विद्यार्थ्यांच्या योगदानातून शाळेच्या विकासाला नवे पंख

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नांदा मराठी येथे उन्हाळी शिबिरांला उत्साहात सुरुवात झाली

         जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नांदा मराठी येथे माजी विद्यार्थी संघाच्या वतीने दिनांक 4 मे 2026 पासून उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन दिनांक 4 मे 2026 ला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नांदा मराठी येथे करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री मुरलीधर बोडखे अध्यक्ष माजी विद्यार्थी संघ हे होते प्रमुख अतिथी म्हणून मा.डिसूजा मॅडम प्राचार्य शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल नांदा फाटा या होत्या* तसेच माननीय रत्नाकर चटप सदस्य तथा सल्लागार माजी विद्यार्थी संघ नांदा मराठी माननीय श्री सतीश जमदाडे सदस्य माजी विद्यार्थी संघ ,मा.गणेश लोंढे,मा नितेश मालेकर सदस्य माजी विद्यार्थी संघ नांदा मराठी ,माननीय सौ संगीता मरापे उपाध्यक्ष शाळा* *व्यवस्थापन समिती नांदा मराठी माननीय लता सोयाम सदस्य शाळा व्यवस्थापन समिती नांदा माननीय श्री विकास भंडारवार साधन व्यक्ती कोरपना कुमारी वैशाली तुम्मे मुख्याध्यापिका, जि प शाळा नांदा मराठी श्री गोविंद प्रसाद गुप्ता सर श्री भगवान नागरगोजे सर विषय शिक्षक श्री गुलाब राठोड सर सहायक शिक्षक श्री विनोद किन्नाके सर उपस्थित होते* सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचे विधिवत पूजन करून शिबिराचे सुरुवात करण्यात आले

       सदर शिबिरात एक तास माझ्या शाळेसाठी हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे या शाळेचे माजी विद्यार्थी सक्रिय सहभाग घेऊन आपल्या क्षेत्रातील माहिती विद्यार्थ्यांना देणार आहेत या उपक्रमाच्या माध्यमातून माजी विद्यार्थी विद्यार्थ्यांना विविध विकास कौशल्य उपक्रम, संगीत, चित्रकला, कला, कार्यानुभव,खेळ,संगीत,करसु रायटिंग,जनरल नॉलेज, नृत्य, वादन,गायन, व्यावसायिक मार्गदर्शन,स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करणार आहे, त्या प्रकारचे नियोजन दिनांक 4 मे 2026 ते 31 मे 2026 या कालावधीचे करण्यात आले* आहे या उपक्रमाच्या माध्यमातून माजी विद्यार्थी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य देणार आहेत *अशा प्रकारच्या शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवीन ऊर्जा आत्मविश्वास आणि शिकण्याची आवड निर्माण होणार आहे.

याप्रसंगी शाळेत नव्याने रुजू झालेले श्री भगवान नागरगोजे सर व श्री विनोद किंन्नाके सर यांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु.वैशाली तुम्मे मुख्याध्यापिका जि प शाळा नांदा म यांनी केले संचालन श्री गोविंद प्रसाद गुप्ता सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री विनोद किन्नाके सर यांनी केले याप्रसंगी शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये