ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलिस पाटील मनोज कामतवार यांचा अपघाती मृत्यू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अतुल कोल्हे

भद्रावती :_ तालुक्यातील मूळ रहिवासी व चंद्रपूर तालुक्यातील साखरवाही गावचे पोलिस पाटील, तसेच सामाजिक कार्यकर्ते मनोज नानाजी कामतवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दि. २६ एप्रिल रोजी झालेल्या रस्ते अपघातात ते गंभीर जखमी झाले होते.

अपघातानंतर त्यांना चंद्रपूर येथील डॉ. मेहरा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी नागपूर येथील एम्स रुग्णालयात हलविण्यात येत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.

मृत्युसमयी ते ५० वर्षांचे होते. त्यांच्या अकाली निधनाने एक उमदा व समाजाभिमुख व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. ते चंद्रपूर जिल्हा भोई समाज सेवा संघाचे आजीव सभासद होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व मोठा आप्तपरिवार असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने साखरवाही व परिसरात शोककळा पसरली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये