आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतली नवनियुक्त पोलीस अधिक्षकांची भेट
जिल्ह्यातील गुन्हेगारी व अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजनांवर भर

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांची आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट घेतली असून जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्ती तसेच अवैध धंद्यांवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी मिळविण्यासंदर्भात चर्चा केली आहे.
भारतीय जनता पक्षाचे माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महामंत्री रवींद्र गुरनुले, मनोज पाल, तुषार सोम, दशरथ सिंग ठाकूर, वंदनाताई हातगावकर, बलराम डोडाणी, अजय जयस्वाल, अमोल शेंडे, महिला महामंत्री सायली येरणे, युवा मोर्चा अध्यक्ष मयूर वाढई, अनुसूचित जमाती अध्यक्ष तथा नगरसेवक जितेश कुळमेथे, घटनेता शेखर शेट्टी, नगरसेवक संजय कंचर्लावार, नगरसेविका अनुजा तायडे, अनुसूचित जाती अध्यक्ष विमलताई कातकर, मंडळ अध्यक्ष स्वप्निल डुकरे अल्पसंख्यांक अध्यक्ष राशीद हुसेन, कौसर खान कामगार झोपडपट्टी अध्यक्ष रामकुमार अकापल्लीवार, सिनेट सदस्य निलेश बेलखेडे, सतीश तायडे, भाजप नेते शिरीष गोगलवार, ईश्वर वाघमारे आदींची उपस्थिती होती.
जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाईची आवश्यकता असल्याचे आमदार जोरगेवार यांनी यावेळी स्पष्ट केले. शहर व ग्रामीण भागात बेकायदेशीर व्यवसाय, जुगार, मटका, अवैध दारू विक्री यांसारख्या प्रकारांवर कडक नजर ठेवून तातडीने कारवाईच्या निर्देश देण्याबाबतही चर्चा झाली.
यावेळी गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांची गस्त वाढविणे, संशयित हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवणे, तसेच स्थानिक नागरिकांचा सहभाग वाढवून पोलिस व जनतेतील समन्वय अधिक बळकट करण्यावर भर देण्यात आला. युवकांमध्ये वाढणाऱ्या गैरप्रवृत्तीला आळा घालण्यासाठी जनजागृती मोहिमा राबविण्याची गरजही यावेळी आमदार जोरगेवार यांनी व्यक्त केली.
आमदार किशोर जोरगेवार यांनी ठामपणे नमूद केले की, जिल्ह्यातील नागरिकांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राधान्याची बाब असून, गुन्हेगारी व अवैध धंद्यांविरोधात शून्य सहनशीलतेची भूमिका घेणे अत्यावश्यक आहे. नव्या नेतृत्वाखाली चंद्रपूर जिल्हा अधिक सुरक्षित आणि गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



