ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रतिकूल परिस्थितीतही मुलींनी शिक्षण घ्यावे

सेवानिवृत्ती कार्यक्रमात मुख्याध्यापिका दुशलता माऊलीकर यांचे भावोद्गार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

वसतिगृहमध्ये असतांना जेवनामध्ये फक्त एक पोळी व पाच घास पुरता भात मिळायचा. तेव्हा तेवढासा भात आणि अर्धी पोळी खायचो व अर्धी पोळी वही- बुकाचे पानात ठेवायचे व दुपारला भूक लागली की, ती अर्धी पोळी खात असू. अशाही परिस्थितीत आम्ही शिक्षण घेतले. आज घडीला शासनाने उत्कृष्ठ अशा शालेय सोई सवलती विध्यार्थिनी करिता उपलब्ध करून दिलेल्या आहेत. महाराष्ट्र शासन मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देत आहे. तेव्हा मुलींनी शिक्षण घेतलं पाहिजे. एक मुलगी शिकली तर ती दोन्ही कुळाचा उद्धार करू शकते. म्हणून मुलींनी अर्ध्यावर शिक्षण सोडू नये. त्यांनी आपले करिअर व जीवनातील लक्षपुर्ती कडे विशेष लक्ष दिले पाहिजे, असे मत सेवानिवृत्त मुख्याध्यापिका दूशलता मावलीकर यांनी आज (३० एप्रिल) रोजी सेवानिवृत्ती कार्यक्रमात व्यक्त केले.

मागील ३७ वर्षांपासून ज्ञानदानाच्या कार्यात कार्यरत असलेल्या उच्च श्रेणी मुख्याध्यापिका दूशलता मावलीकर या ३० एप्रिल रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या, त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओ. बी. सी. कृती समितीचे अध्यक्ष मोरेश्वर सुरकर होते तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कमिटी कोनेरू कोनाप्पा कॉलनी तेलंगणा येथील डी. माधवराव उपस्थित होते.

गोंडपिपरी येथे पार पडलेल्या या सेवानिवृत्ती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. श्रीनिवास तावाडे, शाक्यमुनी सेवाश्रम संस्थेचे सचिव मोरेश्वर दुर्गे, सेवानिवृत्त शिक्षक झावरू उराडे, कमलेश निमगडे, प्रा. बोरकर, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष भारत चंद्रागडे, शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष रामकृष्ण सांगडे, मनोज कोपावर, सूर्यकांत मुंजनकर, डॉ. कुळे, भस्की गुरुजी, वंचितच्या महिला अध्यक्ष रोझा झाडे, ज्येष्ठ पत्रकार संदीप रायपूरे, नितेश डोंगरे, प्रवीण भसारकर,विदर्भ राज्य आंदोलन समितीचे समन्वयक आनंद खर्डीवार, शाळेच्या शिक्षिका सुवर्णमाला भसारकर, कुसुम वासेकर, फुलझेले, छाया चकोले, मनीषा मडावी,ऍड.चैताली फुलझेले, ऍड. अक्षय उराडे, माळी समाज संघटक बळीराज निकोडे, गाव माझा फाउंडेशनचे राजकपूर भडके, माणिकचंद उराडे, दर्शना दुर्गे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन ऍड. सचिन फुलझेले यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. अलोक खोब्रागडे सर यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये