ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावली तालुक्यात कला, विज्ञान आणि वाणिज्य विभागात विश्वशांती उच्च माध्यमिक विद्यालय अव्वल

कुमारी प्रतीक्षा मराठे कला विभागात तर कुमारी दीक्षा जेगठे विज्ञान विभागात तालुक्यात प्रथम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

विश्वशांती उच्च माध्यमिक विद्यालयाच्या उज्वल यशाची परंपरा कायम

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे च्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला या परीक्षेत भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावलीद्वारा संचालित विश्वशांती उच्च माध्यमिक विद्यालय सावली येथील कला ,विज्ञान आणि वाणिज्य या तीनही विभागात तालुक्यातून प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे त्यात कु. प्रतीक्षा अशोक मराठे हिने ४८७ (८१.१७)टक्के गुण मिळवून कला विभागात तालुक्यातून प्रथम तर दीक्षा हितेश जेगठे हिने ४७७(७९.५०) टक्के गुण मिळवून विज्ञान विभागात तालुक्यातून प्रथम तर वाणिज्य विभागात विनायक जयप्रकाश सोनुले याने ४७६ (७९.३३) टक्के गुण मिळवून तालुक्यातून प्रथम येण्याचा बहुमान मिळवला.

 कला विभागात द्वितीय क्रमांक कुमारी स्वेजल विलास घोटेकर ४७७ (७९.५०)टक्के तर तृतीय क्रमांक प्रदीप ओमदेव आभारे ४७०(७९.३३) टक्के गुण मिळवित तृतीय क्रमांक पटकाविला आहे. विज्ञान विभागात द्वितीय क्रमांक कुमारी समीक्षा अतुल देऊरघरे ४६५ (७७.५०) टक्के तर तृतीय क्रमांक कुमारी धनश्री पुरुषोत्तम समर्थ ४४३ (७३.८३) हिने पटकाविला आहे.

वाणिज्य विभागात द्वितीय क्रमांक सुमित सुरेश गडपायले ४३०(७१.६७)टक्के गुण तर तृतीय क्रमांक तुषार दिवाकर संदोकार ४०८(६८.००)टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे. एचएचसीव्हीसी इलेक्ट्रिकल विभागात प्रथम क्रमांक दिशांत प्रल्हाद लोढे, हॉर्टिकल्चर विभाग प्रथम क्रमांक यामिना रुमाजी मंगर,क्रॉप सायन्स विभाग प्रथम क्रमांक बंटी नकटू ठाकूर याने पटकाविला आहे

गुणवंत विद्यार्थ्यांचे भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संदीपभाऊ गड्डमवार ,सचिव राजाबाळ पाटील संगीडवार,सर्व पदाधिकारी तथा सदस्य, विश्वशांती विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार,पर्यवेक्षक राजेश झोडे, विद्यालयातील सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी वृदांनी अभिनंदन करीत पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये