ऐतिहासिक बुद्धभूमी येथे बुद्ध पौर्णिमा कार्यक्रम संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
*बुद्ध पौर्णिमेनिमित्त तारीख १ मे २०२६ ला ऐतिहासिक बुद्धभूमी गडचांदूर येथे सकाळी ७:३० वाजता नियमित बुद्ध वंदनेनंतर सकाळी ८:०० वाजता ऐतिहासिक बुद्धभूमी येथील धम्मध्वजाजवळ तथागत बुद्ध यांची बुद्ध पुजा पाठ करण्यात आली. नियमितपणे वंदनेकरीता येणारे देवराव भगत आणि नामदेवराव लांडगे यांनी धम्मध्वजारोहण केल्यानंतर सामुहिक बुद्ध वंदना घेण्यात आली.*
*ह्या कार्यक्रमात रिपब्लिकन चळवळीचे प्रचारक तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस अशोककुमार उमरे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले) तालुका अध्यक्ष प्रभाकर खाडे, पंचशील बहुहितकारी संस्था हरदोनाचे अध्यक्ष गौतम भसारकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवा जिल्हाध्यक्ष तथा अनैशा वाहन चालक कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरजभाऊ उपरे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे गडचांदूर शहर अध्यक्ष नरेंद्र वानखेडे, शहर उपाध्यक्ष चिंतामणी घुले, सहसचिव राजेश कांबळे, ईश्वर रामटेके, रमेश सोनटक्के, गौतम पथाडे, प्रकाश कवाडे, भिमराव भगत, घोरपडे, नगरपरिषदेचे कर्मचारी, पोलिस स्टेशन प्रतिनिधी, बौद्ध अनुयायी कार्यकर्ते उपस्थित होते.*
कार्यक्रमानंतर भग्नावस्थेत पडलेले विहारे पाहण्यासाठी अशोक कुमार उमरे ,गौतम भसारकर, सुरज उपरे, नरेंद्र वानखेडे, चिंतामणी घुले आणि राजेश कांबळे इत्यादींनी बंगाली कॅम्प कडील काही विहाराची पाहणी केली. कुठे कुठे धार्मिक अतिक्रमणे झाले आहेत आणि ऐतिहासिक मुर्त्यांचे विदृपीकरण होत आहेत. धनाच्या लालचीपणामूळे काही लोकांनी येथील विहाराचे खोदकाम केलेले दिसून आले. यांच्या खोदकामामुळे विहाराचा समतोलपणा बिघडून विहाराचे मलब्यात रुपांतर झाले. विहाराला भग्नावस्था प्राप्त झाली आहे.*
*या भागाचे संरक्षण आणि संवर्धन होणे गरजेचे आहे. त्यासाठी होतकरू कार्यकर्त्यांनी संशयास्पद हालचाली करणाऱ्या लोक दिसल्यास सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. धनासाठी खोदकाम करणाऱ्यांचा लालचीपणा हानून पाडून ऐतिहासिक वारस्याचे जतन केले पाहिजे. असे म्हटले.



