निमणी येथे बुद्ध मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना
साडे तीन फूट उंच बुद्ध मूर्ती ; दानशूर व्यक्तिमत्व सुमन जगताप यांनी दिली भेट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
क्रांतीज्योती महिला मंडळ निमनी तथा सम्राट अशोक बहुद्देशीय युवा संस्था निमणी यांच्या संयुक्त विद्यमाने कोरपना तालुक्यातील निमणी येथे बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी पंचशील बुद्धविहारात साडे तीन फूट उंच भव्य तथागत भगवान गौतम बुद्ध मूर्ती दानशूर व्यक्तिमत्व माजी ग्रामपंचायत सदस्या सुमन जगताप यांनी नागपूर येथून खरेदी करून भेट म्हणून प्रदान केली. या मूर्तीची विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली.
सकाळी ९ वाजता निमणी येथे बुद्धमूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत उपासकांनी पांढरे वस्त्र परिधान करून प्रज्वलित ज्योत घेऊन शांततेचा संदेश दिला. मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर उपस्थित भन्ते सत्यपाल यांच्या हस्ते फुल अर्पण करत दुधाचा अभिषेक करून शुद्ध पाण्याची अंघोळ करून विधिवत पूजा करून बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष उमेश देठे पोलिस पाटिल हिरापूर दानशूर व्यक्तिमत्व सुमन जगताप उमेश राजुरकर माजी उपसरपंच तमूस अध्यक्ष सुभाष जगताप उपसरपंच शिल्पा जगताप अनिल कारेकर निळकंठ देठे वैशाली देठे हिरा ब्राह्मणे प्रमोद देठे आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय प्रबोधनकार आयु संभाजी ढगे यांनी संगीताच्या माध्यमातून द्वेष हा द्वेषाने नाही, तर केवळ प्रेमानेच संपवता येतो.जेव्हा मन स्वच्छ असतं, तेव्हा आनंद सावल्यासारखा सोबत चालतो.” असा भगवान गौतम बुद्धांचा शांततेचा संदेश दिला.
दानशूर व्यक्तिमत्व सुमन जगताप यांचा समाजाच्या वतीने शाल श्रीफळ साडी देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन महेंद्र ब्राह्मणे तर आभार चिराग जगताप यांनी मानले यावेळी परिसरातील नागरिकांनी भोजनाचा आस्वाद घेतला कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विशाल देठे शुद्धोधन जगताप अतुल देठे अनिल जगताप तुषार कातकर अंडीत देठे सहदेव ब्राह्मणे परमेश्वर देठे आकाश देठे परिश्रम घेतले यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



