ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाहतूक पोलीस विभागतर्फ संपुर्ण वर्धा जिल्हयात विशेष मोहीम

वर्धा जिल्हयामध्ये वाढत्या अपघातावर प्रतिबंध घालण्याकरीता सदर विशेष मोहिम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा जिल्हयात होणारे अपघात कमी करण्यासाठी तसेच वाहतूक नियमांचे नागरिकांनी पालन करावे या करोता मा. अपर पोलीस अधीक्षक, सदाशिव वाघमारे साहेब, वर्धा जिल्हा यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक पोलीस विभागतर्फ संपुर्ण वर्धा जिल्हयात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

त्या अनुषंगाने दिनांक २८.०४.२०२६ व २९.०४.२०२६ रोजी कलम १८५ मोवाका (दारु पिऊन वाहन चालविणे) या मोटार वाहन कायद्यानुसार वाहतूक नियंत्रण शाखा, वर्धा येथील अंमलदार सफी/अनिल तिवारी व.नं. ४४३. पोहवा चंद्रकांत तपासे ब.नं. १४९२. पोहया मुकेश राऊत ब.नं. १२६०५० पोशि/दिलीप कामडो वं.नं. १६३. पोहवा/शबोर सैयद ब.नं.८१४. पॉशि/प्रदीप कोवळे .नं. ९८३, यांनी पेट्रोलींग दरम्यान दारु पिऊन वाहन चालविणा-या नमूद वाहन चालकांवर कारवाई केली. कारवाई करण्यात आलेल्या वाहन धारकांची नावे १) कबीर रफिक शहा वय २७ वर्ष, रा. मटन मार्केट जवळ वर्धा २) निकेश नाशिक चव्हान वय २४ वर्ष रा. तिझोडा जि. यवतमाळ ३) आतिश मोहनराव देवतळे वय २१ वर्ष, रा. पवनार, वर्धा या प्रमाणे नमुद वाहन चालक दारुच्या नशेत वाहन चालविताना मिळून आलेत.

तसेच वर्धा जिल्हयामध्ये वाढत्या अपघातावर प्रतिबंध घालण्याकरीता सदर विशेष मोहिम दररोज संपूर्ण वर्धा जिल्हयात राबविण्यात येत असून सर्व नागरिकांना सुचित करण्यात येते की, बिना हेल्मेट मोटार सायकल, बिना सिटबेल्ट चारचाकी वाहन, अती वेगाने व दारु पिऊन वाहन चालवू नये. वाहतूकोच्या नियमांचे पालन करावे. असे आवाहन पोलीस निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा, वां यांचे कडून नागरिकांना करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये