ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
निधन वार्ता : प्रमोद विश्वनाथ झाडे

निधन वार्ता : प्रमोद विश्वनाथ झाडे
गोंडपिपरी तालुक्यातील सकमूर चेकबापूर येथील रहिवासी, युवा शेतकरी प्रमोद विश्वनाथ झाडे (४३ वर्षे) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने आज १ मे रोजी सकाळी ५.०० वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आजच सकमूर येथील वर्धा नदीतीरावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या जाण्याने झाडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा आणि झाडे परिवारासह बराच मोठा आप्त परिवार आहे.



