महाराष्ट्र राज्य स्थापना दिन उत्साहात साजरा..

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
आज महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या 67 व्या वर्धापन दिनानिमित्त वनपरिक्षेत्र कार्यालय, वर्धा प्रादेशिक येथे सकाळी 7.30 वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी कु. वैशाली भलावी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
त्यानंतर उपवनसंरक्षक कार्यालय, वर्धा प्रादेशिक कार्यालयाच्या प्रांगणात दुसरा ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात उपवनसंरक्षक मा. हरवीर सिंग यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रगीत गायन करण्यात आले व ध्वजाला मानवंदना देण्यात आली.
या प्रसंगी उपवनसंरक्षक हरवीर सिंग, सहाय्यक वनसंरक्षक एम. के. आडे, सहाय्यक वनसंरक्षक (वन्यजीव) एच. एस. सरोदे तसेच प्रादेशिक कार्यालयातील वनपाल व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.



