ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तहसील कार्यालय देवळी येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

आज दिनांक १ मे २०२६ रोजी तहसील कार्यालय देवळी येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला… कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री समर्थ क्षीरसागर होते त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला.. यावेळी पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते श्री योगेश कांबळे यांचा कार्याचा गौरव करण्यात येवून त्यांचा सत्कार करण्यात आला. श्री अशोक झिलपे यांनी ३८ वर्षे देशसेवा करून निवृत्त झालेल्या माजी सैनिकाचा सुद्धा सत्कार करण्यात आला.

तसेच आज पासून स्वगणा अभियानाला तहसीलदार यांचे हस्ते सुरवात करण्यात आली असून तहसिलदार यांनी स्वतः पासून याची सुरवात करून तालुक्यातील सर्व महसुल सेवकाकडून स्वगणना करून घेतली असून नागरिकांनी जास्तीत जास्त स्वगणना करण्याचे आवाहन त्यांनी केले…. कार्यक्रमास श्री.समर्थ क्षीरसागर, तहसीलदार श्री राजेंद्र सयाम, नायब तहसीलदार श्रीमती माय चावडीपांडे, नायब तहसीलदार श्रीमती हेमा जाधवर, नायब तहसीलदार श्रीमती चांदणी शिवरकर निरीक्षण अधिकारी, प्रमुख पाहुणे श्री योगेश कांबळे,श्री अशोक झिलपे, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक, अधिकारी कर्मचारी वृंद उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अमोल आगलावे, सहाय्यक महसूल अधिकारी यांनी केले

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये