वर्धा व आर्वी उपविभाग तर्फे दारूबंदी कायदयान्वये वॉशआउट मोहिम
एकूण 20 लाख 15 हजारावर मुद्देमाल जप्त करून नष्ट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
मा. पोलीस अधीक्षक वर्षा यांना तकार प्राप्त झाली की मौजा भिवापूर सारवाडी येथील बेड्यावर मोठ्या प्रमाणात हात भट्टया लावून गावठी मोहा दारू गाळीत आहे अशा माहिती वरून पोलीस अधिक्षक वर्धा यांनी त्थानिक गुन्हे शाखा, वर्धा व उपविभाग आर्वी यांना दारूबंदी कायदयान्वये वॉशआउट मोहिम राबविण्याचे आदेशीत केले असता.
दिनांक 30/04/2026 सकाळ ये 06.30 वा दरम्यान सदरील वेडयावर दारूबंदी मोहिमे अंतर्गत गावठी मोहा दारू गाळण्याच्या भट्टयांवर कारवाई करून एकुण 4 केसेस करण्यात आले असून आरोपी नामे 1) मंगेश पवार, 2) सुतेश भोसले, 3) रवेश पवार, 4) साधना भोसले, 5) रूशिता चव्हाण सर्व राहणार सारवाडी बेडा यांच्यावर दारूबंदी कायदयान्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहे. सदर वॉशआउट मोहिमेत एकुण 64 ड्रम मध्ये 12,800 लिटर मोहा सडवा रसायण कि, 19,20,000/-रू. मौहा सडवासाठी वापरण्यात आलेले 64 ड्रम कि. 64,000/- तसेच इतर साहित्य जर्मन घमेले, जळावू लाकडं कि. 21,100/-रू. असा एकुण जु. कि. 20,15,100/- रू चा मुद्देमाल जप्त करून रासायनिक परिक्षणार्थ सॅम्पल घेवून उर्वरित सर्व मुद्देमाल घटणास्थळीच जागेवरच नष्ट करण्यात आला. सदर वॉशआउट मोहिमेकरिता एकूण 7 अधिकारी व 40 अंमलदार लावण्यात आले होते.
सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक, वर्धा श्री. सौरभ कुमार अग्रवाल, मा. अपर पोलीस अधीक्षक, वर्धा श्री. सदाशिव वाघमारे, यांच्या मार्गदर्शनात उपविभागिय पोलीस अधिकारी, आर्वी श्री. चंद्रशेखर ढोले, पोलीस निरीक्षक श्री विनोद चौधरी स्था.गु शाखा, वर्धा सहायक पोलीस निरीक्षक श्री मंगेश भोयर यांनी पो. स्टाफसह केली.



