ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
युवा नेते अनिल रामाने यांचे अकस्मात निधन
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
खरेदी विक्री संघ, देऊळगाव राजा येथील माजी अध्यक्ष अनिल रामाने, वय 41 वर्षे,यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने उज्जैन येथे निधन झाले, अनिल रामाने मित्रासह देवदर्शनासाठी गेले होते, तेथेच त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटक्याने निधन झाले, देउळगाव राजा येथे त्यांच्यावर अतिशय शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यांच्या पश्चात वडील, भाऊ, बहीण, पत्नी, एक मुलगा, दोन मुली तथा बराच मोठा आप्त परिवार आहे , माजी नगराध्यक्ष विष्णू रामाने यांचे पुत्र तसेच नगर परिषद विरोधी पक्ष गट नेत्या रंजना रामाने यांचे पती होते, अनिल रामाने यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.



