ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स मध्ये पदवी वितरण समारोह संपन्न 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदूर येथील महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स मध्ये दिनांक २२ एप्रिल रोजी सत्र २०२४-२५ मधील B.Sc. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवी वितरित करण्यासाठी पदवी वितरण समारोह आयोजित करण्यात आला. पाहुण्यांच्या हस्ते द्वीप प्रज्वलन व महापुरुषांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून आधी विद्यापीठ गीत व महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री विठ्ठलराव थिपे, उपाध्यक्ष, गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर हे होते. विशेष अतिथी म्हणून मा. श्री अरविंद बरुआ, वरिष्ठ व्यवस्थापक, दालमिया सिमेंट कंपनी, नारंडा म्हणाले विज्ञान विषयातील विद्यार्थ्यांनी तार्किक रित्या अभ्यास केल्यास भविष्य उज्वल करता येते. गडचांदूरसारख्या औद्योगिक नगरीतील या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विज्ञान विषय घेऊन पदवी प्राप्त केली, त्याचे अभिनंदनही केले. कार्यक्रमाला लाभलेले दुसरे महत्वपूर्ण अतिथी डॉ. अनिल चिताडे प्राचार्य, राजीव गांधी अभियांत्रिकी व संशोधन संस्था, चंद्रपूर, तथा संचालक, ग. शि. प्र. मं. यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यापीठ सर्व विद्यार्थ्यांना पदवी बहाल करू शकत नाही म्हणून महाविद्यालय स्तरावर अश्या प्रकारचे कार्यक्रम राबवावे लागतात. मोठे अधिकारी बनायचे असेल तर प्रथम पायरी म्हणून ग्रॅज्युएट होणे आवश्यक आहे.

भावी जीवनात यशस्वी व्हा, अश्या शुभेच्छ्या दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. शैलेंद्र देव यांनी केले , संस्थेचे उपाध्यक्ष . विकासभाऊ भोजेकर, सचिव धनंजय गोरे, सदस्य रामचंद्र सोनपितरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजक डॉ. रामकृष्ण पटले यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष मेहनत केली महाविद्यालयातील प्रा. डॉ. अनिस खान, प्रा. चेतन वानखेडे, डॉ. अजय कुमार शर्मा, डॉ. संदीप घोडिले, प्रा. चेतन वैद्य, डॉ. उत्कर्ष मुन हे प्राध्यापक व सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवून पदवी संपादन केली. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन ग्रंथपाल, डॉ. मनोहर बांदरे यांनी केले , राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये