ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोंभुर्ण्यात गॅस एजन्सीविरोधात नागरिकांचा संताप

कारवाईची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर

पोंभुर्णा : शहरातील “अतुल एच. पी. गॅस एजन्सी”च्या मनमानी कारभाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून, याबाबत आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे तक्रार अर्ज सादर करण्यात आला आहे.

श्री. जयंत अरुण पिंपळखेडे व इतर नागरिकांच्या वतीने दिलेल्या अर्जात नमूद केल्याप्रमाणे, गॅस बुकिंग करूनही वेळेवर सिलिंडर मिळत नसल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. एजन्सीकडून कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असून, काही ठराविक ग्राहकांनाच प्राधान्याने गॅस वितरण होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याशिवाय, ग्राहकांकडून गॅस कार्ड एजन्सी कार्यालयात जमा करून घेणे, नियमबाह्य पद्धतीने व्यवहार करणे, तसेच तक्रार केल्यास “कार्ड ब्लॉक करू” अशा धमक्या देण्यात येत असल्याचेही अर्जात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना महिनाभर गॅससाठी चकरा माराव्या लागत असल्याचे चित्र आहे.

या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून, संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, तसेच ग्राहकांना वेळेवर गॅस मिळण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, या तक्रारीवर प्रशासन व संबंधित विभाग काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये