अवैद्य दारू वाहतुकीवर सावंगी मेघे पोलीसांची धडक कार्यवाही
1 लाख 30 हजारावर मुद्देमाल जप्त
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पो स्टे सावंगी मेघे येथील पोलीसांची कार्यवाही सावंगी (मेघे) पोलीस हे पो स्टे परीसरात पेट्रोलींग करीत असताना मुखबीरकडुन खात्रीशीर खबर प्राप्त झाली की ईंदीरानगर झोपडपट्टी, आर्वी नाका, ता.जी. वर्धा येथे राहणारा सुरज ऊर्फ टोली धाडवे हा आपले निळ्या कलरचे सुझुकी कंपनीच्या अॅक्सेस गाडीवर व डीकीत विना पास परवाना देशी व विदेशी दारुचा माल घेवुन सिंधी मेघे वर्धा ते नागठाणा रोडने सिंधी (मेघे) कडुन नागठाणा येथे रोडने जाणार आहे. अशा खबरेवरून आम्ही पंच व पो स्टॉफसह त्याचेवर प्रोरेड कारवाई करणे कामी खाजगी वाहणाने रवाना झालो पंच व पो स्टॉफसह अग्ग्रीहोत्री कॉलेजचे गेटजवळ नागठाणा रोडवर नाकेबंदी करून थांबलो असता काही वेळाने एक निळ्या कलरची सुझुकी अॅक्सेस मोपेड गाडी सिंधी मेघे वर्धा कडुन नागठाणा कडे रोडने येताना दीसली खबरे प्रमाणे तिची खात्री करून सदर मोपेड गाडी जवळ येताच पो स्टॉफच्या मदतीने शिताफिने छापा टाकत असता सदर मोपेड चालकास दुरुनच पोलीस असल्याची चाहुल लागताच तो आपले ताब्यातील सुझुकी अॅक्सेस मोपेड गाडी मौक्यावर टाकुन पसार झाला पो स्टॉफचे मदतीने त्याचा शोध घेतला असता मिळुन आला नाही पंचासमक्ष मौक्यावर पाहणी केली असता मौक्यावर विना नंबरचे सुझुकी अॅक्सेस गाडीचे डीक्कीत व पायदानावर देशी विदेशी दारुचा माल पुढीलप्रमाणे मिळुन आला 1) जुनी वापरती निळ्या कलरची सुझुकी कंपनीची अॅक्सेस गाडी विनाक्रमांकाची जीचा ईजीन नंबर MB8DP12DEM8740980 आहे जीची कींमत 100000/- रुपये 2) ऑफीसर चॉईस कंपनीच्या विदेशी दारूने भरलेल्या 180 एम.एल. च्या 36 शिश्या प्रती शिशी 300 रू. प्रमाणे 10800/- रू. चा माल 3) 02 कागदाचे खोक्यात टॅन्गो पंच कंपनीच्या देशी दारुने भरलेल्या 90 एम.एल. च्या 200 प्लॉस्टीक शिश्या प्रती शिशी 100 रू. प्रमाणे 20000/- रु. चा माल असा एकुन जु.की. 130800/-रु चा मुद्देमाल मिळुन आल्याने मौक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून नमुद पसार आरोपी विरूध्द लेखी फिर्याद वरून सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. सदाशिव वाघमारे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा श्री. प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथील ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज वाघोडे, पोहवा अभय खोब्रागडे ब.नं 274, पोशी शाम सलामे ब.नं 1654, पोशी गौरव नरताम व न 681 सर्व नेमुणकीस पोलीस स्टेशन सावंगी मेघे यांनी केली आहे.



