खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस सेलू पोलिसांनी केले जेरबंद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस स्टेशन सेलू येथे दिनांक 11/04/2026 रोजी फिर्यादी नामे सौ.पुष्पा योगराज राऊत रा. बेलगाव ता.सेलू, जि.वर्धा यांनी पोलीस स्टेशनला येवून तक्रार दिली की, त्यांच्या मुलगा प्रवीण राऊत याचा आरोपी नामे सूरज ढगे, व फारूक करीम खा पठाण दोन्ही राहणार बेलगाव तह सेलू यांनी खून करून त्याचा मृतदेह बोर नदीपात्रात फेकून दिला आहे अशा तक्रारी वरून नमूद आरोपी यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन सेलू येथे अप न 288/26 कलम 103(3), 238, 3(5) भारतीय न्यास संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील आरोपी नामे सूरज ढगे यास अटक करण्यात आली होती. तर आरोपी नामे फारूक करीम खा पठाण रा. बेलगाव हा फरार झाला होता.

तपासादरम्यान ठाणेदार देवेंद्र ठाकूर यांचे मार्गदर्शनात सेलू पोलीसांनी तपास चक्र फिरवून सदर गुन्हयाचा तांत्रीक पध्दतीने तपास करून दिनांक 21/04/2026 रोजी सदर गुन्हयातील फरार आरोपी नामे फारूक करीम खा पठाण वय 32 वर्ष, रा. बेलगाव, तह सेलू, जिल्हा वर्धा याचा शोध घेऊन त्यास नागपूर येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली तसेच सदर गुन्ह्यात आरोपी नामे गणेश रमेश ढगे वय 26 वर्ष रा. बेलगाव रोड सेलू याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास बेलगाव येथून अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रितम निमगडे करीत आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री.सौरभकुमार अग्रवाल साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, मा, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात सेलू ठाणेदार देवेंद्र ठाकूर यांचे निर्देशाप्रमाणे पो.उपनि. प्रितम निमगडे, पोलीस अमंलदार गणेश राऊत, जावेद धामिया,ज्ञानदेव वनवे, पोलीस स्टेशन सेलू यांनी केली.



