अधिकारी कार्यवाही करण्यात व्यस्त – तर कर्मचारी मलाई जमा करण्यात दंग
खडकपूर्णा - अवैध रेती उपसा आणि वाहतूक थांबेना.?
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
खडकपूर्णा नदी पात्र तसेच धरण परिसरातून अवैध रेती उपसा तसेच वाहतूक करण्यासाठी तस्करांनी विभागापेक्षा एक पाऊल पुढे टाकले आहे. महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी कार्यवाही जरी करत असले तरी त्याच विभागातील कनिष्ठ कर्मचाऱ्यांना हाताशी धरून अवैध रेती तस्कर आपला कार्यभाग सिद्धीस नेताना दिसत आहे. अधिकाऱ्यांना आपल्या विभागात कोणते कनिष्ठ कर्मचारी रेती तस्करांना पूर्ण सहकार्य करतात याची माहिती असल्याची चर्चा रंगत असताना संबंधित अधिकारी या कर्मचाऱ्यांवर कार्यवाही का करत नाही यावर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तालुक्यातील खडकपूर्णा नदी पात्र तसेच धरण हे तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यातील मोठे अवैध रेती तस्करांचे एक प्रकारे हॉटस्पॉट बनले आहे. महसूल विभागाने यावर निर्बंध घालण्यासाठी अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली काही पथकांची स्थापना केलेली आहे. मात्र या पथकातील कनिष्ठ सदस्यच अधिकाऱ्यांच्या हालचालीची माहिती त्रयस्थ मार्फत सदर रेती तस्करापर्यंत पोहोचत असल्यामुळे एक-दोन अधिकारी सदर कर्मचाऱ्यांच्या सहकार्य विना तस्कर विरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकाचे प्रयत्न निष्फळ ठरत असल्याचे बहुतांशी वेळी घडलेले आहे. यावर मात्र सदर कनिष्ठ कर्मचारी कारवाई संदर्भात चुप्पी साधून स्व: आर्थिक विकास साधत असल्याने रेती तस्करांना मात्र या ठिकाणी हिरवे कुरण उपलब्ध झाले असून तेरी भी चुप मेरी भी चुप याप्रमाणे सदर कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन आचरणातून स्पष्ट होते. तरीसुद्धा वरिष्ठ अधिकारी या कर्मचाऱ्यावर कारवाई करत नसल्याने सर्वसामान्य जनतेतून आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.
*महिला अधिकारी असल्याचा महसूल कर्मचाऱ्यांना फायदा* एकीकडे आपण जागतिक महिला सबलीकरणाकडे वाटचाल करत असताना या ठिकाणी मात्र महिला अधिकारी असल्याचा महसूल कर्मचाऱ्यांना चांगलाच फायदा मिळत असल्याची चर्चा सध्या ऐकावयास मिळत आहे. किती तस्कर बहुतांशी वेळी आपला कार्यभार तडीस नेण्यासाठी रात्रीची वेळ निवडतात. कितीही महिला अधिकारी शिस्तप्रिय असली तरी रात्रीच्या वेळी कार्यवाहीस निघताना मोठ्या आवाहनांना सामोरे जावे लागते. कठीण आव्हानांना सामोरे जात अधिकारी कारवाई करतात. ज्या रेती तस्करांनी या कनिष्ठ कर्मचाऱ्यांशी नसेल तर त्यावर अधिकाऱ्यांसह कर्मचारी यावर कार्यवाहीचा बडगा उभारतात.
परंतु कार्यवाहीसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना याची पुसट शीही कल्पना नसते. अशा या पगार शासनाची आणि चाकरी रेती तस्करांची करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई कधी होणार याची चर्चा मात्र तालुक्यात जोर धरू लागली आहे. *तहसीलदारांनी अवैध रेती वाहतूक करताना टिप्पर पकडला* तहसीलदार वैशाली डोंगर जाळ आणि त्यांच्या पथकाने खडकपूर्णा धरण परिसरातून अवैध रेती वाहतूक करताना दिनांक 18 च्या सायंकाळी एम एच 28 बीए 7222 हा टिप्पर टाकरखेड भागिले येथून अवैधरित्या रेतीची वाहतूक करताना पकडला त्यामध्ये पाच ब्रास रेती आणि सदर टिप्पर जप्त करून देऊळगाव राजा पोलीस स्टेशनला जमा करण्यात आलेला आहे. त्यांच्या समवेत महसूल सेवक कविता खरात, आणि विठ्ठल हरणे यांनी सहकार्य केले



