ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भरधाव पिकअपची दुचाकीला धडक

एक जखमी, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा: भरधाव व निष्काळजीपणे चालविलेल्या पिकअप वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने एक जण जखमी झाल्याची घटना देऊळगाव राजा–जालना रोडवरील गौरव वाईन बारसमोर घडली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश दशरथ खांडेभराड (वय ५०, रा. आदर्श कॉलनी, देऊळगाव राजा, जि. बुलडाणा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पिकअप क्रमांक MH 28 BB 6269 च्या चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 281 व 125(अ) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ही घटना दि. १७ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजताच्या सुमारास घडली. फिर्यादी यांचे भाऊ विजय दगडू खांडेभराड हे त्यांच्या दुचाकी (MH 28 K 8856) वरून अशोका धाब्यावर जेवण करून घरी परतत असताना जालना बाजूकडून पाठीमागून येणाऱ्या पिकअपने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात विजय खांडेभराड हे जखमी झाले.

या प्रकरणी १८ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ४.३१ वाजता देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात कायमी अप नं. १७०/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद गवई (ब. नं. १४१) हे करत असून, गुन्हा नोंदणीची प्रक्रिया सहायक फौजदार निलीमा जाधव (ब. नं. ८३१) यांनी पार पाडली आहे.

पोलिसांनी संबंधित वाहनचालकाचा शोध सुरू केला असून अपघाताच्या अधिक तपासात पुढील माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये