वाहतूक पोलीस विभागतर्फे संपुर्ण वर्धा जिल्हयात विशेष मोहीम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा जिल्हयात होणारे अपघात कमी करण्यासाठी तसेच वाहतूक नियमांचे नागरिकांनी पालन करावे या करीता मा. अपर पोलीस अधीक्षक, सदाशिव वाघमारे साहेब, वर्धा जिल्हा यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक पोलीस विभागतर्फे संपुर्ण वर्धा जिल्हयात विशेष मोहीम राबविण्यात आली.

त्या अनुषंगाने दिनांक १९.०४.२०२६ रोजी विशेष माहिम दरम्यान संपुर्ण वर्धा जिल्हयात कलम १८५ (दारु पिऊन वाहन चालविणे) मोटार वाहन कायद्यानुसार पोलीस स्टेशन कारंजा -२, सांवगी- १, हिंगणघाट-२, आर्वी १, सेवाग्राम १, पुलगांव-२, समुद्रपूर- १ अशा एकुण १० केसेस करण्यात आल्या आहेत. कारवाई करण्यात आलेल्या वाहन धारकांची नावे १) छत्रपती शामरावजी आत्राम वय ४० वर्ष, रा. इंदीरानगर कारंजा, २) संदीप देविदास काळबांडे वय ३२ वर्ष रा. गवंडी ता. कांरजा जि. वर्धा ३) किरण सुभाष बोबाटे वय ३० वर्ष, रा. बोरगाव मधे, वर्धा ४) राहूल मनोहर येटे वय २६ वर्ष, रा. हिंगणघाट ५) राजू संभाजी सरकाटे वय ४९ वर्ष रा. शास्त्री वार्ड हिंगणघाट ६) अविनाश सुनिल बोन्द्रे वय २८ वर्ष रा. आंबेडकर वार्ड, आर्वी ७) पंकज सहदेव इंगळे वय २६ वर्ष, रा. सेलू ८) शुभम मनिष अडकने वय ३४ वर्ष, रा. नागपूर अजनी रेल्वे कॉलनी ता.जि. नागपूर ९) गणेश कवडूजी सुरकार वय ३५ वर्ष, रा. गुंजखेडा ता. देवळी जि. वर्धा १०) प्रशांत मधुकर छापेकर वय ४३ वर्ष, रा. नारायणपुर ता. समुद्रपूर जि. वर्धा या प्रमाणे नमुद वाहन चालक दारुच्या नशेत वाहन चालविताना मिळून आलेत.
तसेच वर्धा जिल्हयामध्ये वाढत्या अपघातावर प्रतिबंध घालण्याकरीता सदर विशेष मोहिम दररोज संपूर्ण वर्धा जिल्हयात राबविण्यात येणार असून नागरिकांना सुचित करण्यात येते की, बिना हेल्मेट मोटार सायकल, बिना सिटबेल्ट चारचाकी वाहन, अती वेगाने व दारु पिऊन वाहन चालवू नये. वाहतूकीच्या नियमांचे पालन करावे. असे आवाहन पोलीस निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा, वर्धा यांचे कडून नागरिकांना करण्यात येत आहे.



