भद्रावती येथे श्रीगुरुदेव सर्वांगिण सुसंस्कार शिबिराचे आयोजन
भद्रावती येथे होणार संस्काराचा महायज्ञ : ग्रामजयंतीच्या शुभपर्वावर भद्रावती येथे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
श्रीगुरुदेव सर्वांगिण सुसंस्कार शिबिर समिती भद्रावती चे वतीने दिनांक २३ एप्रिल ते ३ मे २०२६ पर्यंत गणपती मंदिर, सुर्यमुखी हनुमान मंदिर परिसर, भक्त निवास गवराळा येथे श्रीगुरूदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या सुसंस्कार शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना प्रामुख्याने बौध्दीक, व्यायाम, संगीत या विषयाअंतर्गत मल्लखांब, टाळ व पदन्यास, लाठी-काठी, कुस्ती, दांडपट्टा, कराटे, गायन, वादन, वकृत्व कला, श्रीमद्भगवदगीता, ग्रामगीता, थोर-मोठ्यांचे चरित्र, वक्तशीरपणा, संगीताचे प्राथमिक ज्ञान इत्यादी सद्गुण संवर्धनाचे विषय शिकवल्या जाणार आहे. २३ एप्रिल पासुन सुरु होणा-या या शिबीराचा समारोपीय कार्यक्रम अनेक मान्यवरांच्या उपस्थितीतीत दिनांक ३ मे रोज रविवारला संध्याकाळी ६ वाजेपासून सुरु होणार असुन कार्यक्रम प्रसंगी शिबीरादरम्यान विद्यार्थ्यांना शिकविलेल्या विविध विषयांचे प्रात्यक्षिके व सन्मान सोहळा विद्यार्थी सादर करणार आहेत. तसेच ग्रामजयंतीच्या शुभ पर्वावर सुरु होणा-या या शिबीरादरम्यान राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा जन्मदिवस अर्थात ग्राम जयंती महोत्सव दिनांक 30 एप्रिल रोज गुरुवारला पहाटे ५.०० वाजता साजरा करण्यात येणार आहे. कार्यक्रम प्रसंगी शिबिरातील विद्यार्थी संगीतमय राष्ट्रसंत जन्मावतरण सोहळा व पुष्पांजली सोहळा सादर करण्यात करणार आहेत. होणाऱ्या कार्यक्रमाकरिता नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समितीचे वतीने करण्यात आले आहे.
शिबिरामध्ये वय वर्षे १० ते १४ वयोगटामधील विद्यार्थ्याना प्रवेश असुन , प्रवेश नोंदणी दिनांक २२ एप्रिल २०२६ रोज बुधवारला सायंकाळी ४.०० ते ६.०० वाजेपर्यंतच होईल. अपेक्षित प्रवेश पूर्ण झाल्यानंतर प्रवेश प्रक्रिया बंद करण्यात येईल. श्रीगुरुदेव सर्वांगिण सुसंस्कार शिबिरामध्ये प्रवेशासंबधी अधिक माहितीकरीता 7218158090, 9850492404, 9767875734, 8657375525, 9158437776 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन श्रीगुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबीर समिती, भद्रावतीचे वतीने करण्यात आले आहे .



