ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मंदिरातील घंटा चोरी : पोलिसांत तक्रार दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

              शहरातील गणेश मंदिर व हनुमान मंदिरातील घंटा चोरीची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही घटना दि. १८ एप्रिल रोजी दुपारी १२ ते २ वाजण्याच्या सुमारास घडली.

माहितीनुसार, चोरट्यांनी गणेश मंदिर तसेच हनुमान मंदिरातील सुमारे दोन किलो वजनाच्या दोन घंटा चोरून नेल्या. दुपारच्या वेळेस मंदिर बंद असते व तीव्र उन्हामुळे परिसरात वर्दळ कमी असते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी ही चोरी केल्याचे समोर आले आहे.

सायंकाळच्या वेळी काही नागरिकांच्या निदर्शनास ही बाब आली व त्यांनी याची माहिती माजी नगरसेवकांना दिली. त्यानंतर या घटनेची तक्रार पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला असून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये