बेवारस मुक्या जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
१) सामाजिक कार्यकर्ते विल्सन मोखाडे यांचा पुढाकार
वर्धा : दुष्काळाचा वणवा चहूकडे पेटलेला असतांना अवघे समाजमन अस्वस्थ झालेले आहे.जनावरे पाणी पिण्यासाठी व्याकूळ झालेले असतांनाच सामाजिक कार्यकर्ते विल्सन मोखाडे यांना मुक्या जनावरांची होणारी तळमळ जाणवली.
सामाजिक कार्यकर्ते विल्सन मोखाडे यांनी स्वतः हा दोन डबक्यांमध्ये पाणी भरुन सावंगी (मेघे) बायपास ते डोडाणी स्टील कंपनी पर्यंत.तसेच जिथे बेवारस जनावरांसाठी पाणी नाही अशा निर्जन रस्त्याच्या कडेला पाण्याची व्यवस्था करुन जनावरे, निसर्ग, आणि पर्यावरणाशी नाते अधिकाधिक दृढ करण्याकडे गेल्या वर्षी पासून पाऊल टाकले आहे.गेल्या वर्षी समाधान कारक पाऊस पडला नसल्याने दुष्काळाचा विळखा पडल्याचे सर्वत्र दिसून येत आहे.भूजल पातळी खालावली असून सरासरी ४० ते ४५ अंशाच्या पलीकडे गेलेल्या तापमानामुळे जनावरांच्या जीवाची तगमग सुरु आहे.मिळेल त्या साधनांनी आणि जमेल त्या पद्धतीने या परिस्थिती चा सामना करण्याचे मानवी प्रयत्न सुरु आहेत.मात्र,मुक्या जनावरांच्या अवस्थेचे काय? त्यांच्या जीवाची होणारी तगमग कशी थांबणार? सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहणाऱ्या विल्सन मोखाडे यांनी अशा निर्जन ठिकाणी जिथे बेवारस जनावरांचा वावर असतो.
तिथे जावून पसरट पात्रामध्ये पाणी ठेवून पाण्यासाठी व्याकूळ अशा मुक्या जनावरांची तहान भागवित आहे.हा सुत्य उपक्रम यांनी गेल्या वर्षी पासूनच सुरु केला असून या उपक्रमात कधीच खंड पडू न देता दरवर्षीच उन्हाळ्याच्या एप्रिल व मे महिन्यात हा उपक्रम राबवण्यात येणार असून या उपक्रमामुळे जगावेगळे समाधान मिळत असल्याचे विल्सन मोखाडे यांनी सांगितले.या सुत्य उपक्रमामुळे सामाजिक कार्यकर्ते विल्सन मोखाडे यांचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.



