पोलीस भरतीत यश — कुमारी चैताली पोतराजे यांचे गावकऱ्यांकडून कौतुक
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.विजय वासेकर
पोंभुर्णा तालुक्यातील मोहाळा येथील कुमारी चैताली संजय पोतराजे यांनी पोलीस भरतीत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल गावकऱ्यांनी व परिवाराने आनंद व्यक्त करत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
चैताली यांच्या मेहनत, जिद्द आणि चिकाटीमुळे त्यांनी हे यश मिळवले असून, त्यांच्या यशामुळे गावाचे नाव उज्ज्वल झाले आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे गावातील इतर युवक-युवतींनाही प्रेरणा मिळत आहे.
या प्रसंगी अरविंद दादा तारकर, सुरज पोतराज, अंकित पोतराजे, अक्षय पोतराजे, मोहित पोतराजे, तनुष पोतराजे, जितेंद्र ढवस आणि मनोज गौरकार (गडचिरोली) यांनी चैताली यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
गावकऱ्यांनी सांगितले की, चैताली पोतराजे यांचे यश हे संपूर्ण गावासाठी अभिमानास्पद असून, त्यांच्या पुढील सेवाकाळातही त्या उत्तम कार्य करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.



