ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अनैशा वाहन चालक कामगार संघटनेच्या वतीने महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

चांदा ब्लास्ट

वाहनचालक व कामगारांवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी अनैशा वाहन चालक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेची स्थापना करण्यात आली. त्याचा रजिस्टर नंबर महाराष्ट्र राज्य एनजीपी ५७३३ आहे. वाहन चालक कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरजभाऊ उपरे यांनी संघटनेच्या विस्तारीकरण करण्यासाठी नुकत्याच महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून त्या त्या भागातील पदाधिकाऱ्यांकडे पदभार सोपविण्यात आला आहे.

अनैशा वाहन चालक कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या खालीलप्रमाणे पदनियुक्त्या करण्यात आल्या-

चंपत राजूरकर चंद्रपूर युवा जिल्हा अध्यक्ष, अकोला जिल्हाध्यक्ष हफीज खान शाबिर खान, नामदेव मुरमुरे यवतमाळ जिल्हाध्यक्ष, यवतमाळ जिल्हा सल्लागार मोहम्मद जिकर मोहम्मद अकबर, बार्शिटाकळी तालुका अध्यक्ष निलेश घनगाव, हर्षद लहाने यवतमाळ युवा जिल्हा अध्यक्ष,अविनाश राठोड दिग्रस तालुका अध्यक्ष,उर्वरित महाराष्ट्रातील जिल्हा आणि तालुका पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

संघटनेच्या वतीने तारीख २९ एप्रिल २०२६ ला मौजा कुकुडसाथ तालुका कोरपना जिल्हा चंद्रपूर महाराष्ट्र राज्य येथील शेतकरी भवन येथे राज्यस्तरीय वाहनचालक कामगार संघटनेचे भव्य संमेलन घेण्यात येणार असून देशभरातील वाहन चालक आणि देशपातळीवरील वाहनचालक संघटनेचे प्रतिनिधी ह्या सहभागी होणार आहेत.

वरील पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देते वेळी खालील सहकारी शेख फिरोज शेख हनीफ, मलखासिंग टाकळे, रवींद्र जाधव, योगेश राठोड, राहुल खडे, संतोष खरात, अवधूत बुरकुले, शेख अब्दुल शेख अकबर, प्रशांत ढाले, नितेश चव्हाण, सुरेश राठोड, रतन खंडारे उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये