ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना साहित्य वितरण 

चांदा ब्लास्ट

घुग्घुस, चंद्रपूर : महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वेकोली वणी क्षेत्रातील टेंपो क्लब येथे सिस्टा (कोल इंडिया एस.सी./एस.टी. एम्प्लॉय असोसिएशन) तसेच घुग्घुस उपक्षेत्रातील सर्व श्रमिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, १५ एप्रिल २०२६ रोजी प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या प्रसंगी घुग्घुस येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना बॅग, पुस्तके व इतर अध्ययन साहित्य देऊन शिक्षणाबाबत प्रेरणा देण्यात आली.

कार्यक्रमाला घुग्घुस उपक्षेत्र व्यवस्थापक, खान व्यवस्थापक, सीएमओ आरआरएच अधिकारी, घुग्घुस कॉम्प्लेक्स व वणी क्षेत्रातील विविध अधिकारी, कार्मिक व्यवस्थापक, विविध संघटनांचे अध्यक्ष व सचिव, जेसीसी सदस्य, वेल्फेअर पदाधिकारी, तसेच सर्व कर्मचारी, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सिस्टा वणी क्षेत्र व सिस्टा युनिटच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना व कामगारांना मार्गदर्शन करताना महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व पटवून दिले. “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” हा संदेश आजही समाजाच्या प्रगतीसाठी मार्गदर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी त्यांच्या आदर्शांवर चालण्याचा संकल्प केला. संपूर्ण कार्यक्रम श्रद्धा, आदर आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये