19 एप्रिल रोजी महर्षि वसिष्ठ वेद विद्यालयचा चतुर्थ वर्धापन दिन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
ग्रामदैवत श्री बालाजी महाराज यांच्या पुण्यभूमी देऊळगाव राजा येथे प पू श्री गु मोहननाथ महाराज पैठणकर यांच्या मार्गदर्शनाने व शुभाशिर्वादाने श्री संत नरहरीनाथ महाराज संस्थान येथे सुरू असलेल्या महर्षी वसिष्ठ वेद विद्यालय, श्री संत तुकाराम महाराज वारकरी विद्यालय चा चतुर्थ वर्धापन दिन अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर 19 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे.
या समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून तर्पण फाउंडेशन चे अध्यक्ष आमदार श्रीकांतजी भारतीय राहणार आहे तर प्रमुख उपस्थिती मध्ये आमदार मनोज कायंदे, माजी आमदार कैलास गोरंट्याल , कलावती हॉस्पीटल चे संचालक प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ कृष्णा कोरडे, सी ए संदीप माहोरकर उपस्थित राहणार आहेत.
यानिमित्ताने अध्यापक व इतर सहयोगीजनांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांचे प्रतिभा सादरीकरण होणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन श्री संत नरहरीनाथ महाराज संस्थान, श्री क्षेत्र देऊळगाव राजा यांनी केले आहे



