सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता विकास स्पर्धेत पालडोह शाळेचे सुयश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे
जिवती :- नाविन्यपूर्ण ३६५ दिवस चालणारी जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पालडोह ने परत आपली छाप सोडली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगी शैक्षणिक गुणवत्ता विकासास अधिक प्रेरणा मिळावी यासाठी तालुकास्तरीय सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम २०२६-२७ अंतर्गत विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत प्रश्नमंजुषा स्पर्धा,चित्रकला स्पर्धा,निबंध स्पर्धा,वकृत्व स्पर्धा सोबतच चावडीवाचन स्पर्धा घेण्यात आल्या.
सदर स्पर्धा पंचायत समिती सभागृहात घेण्यात आल्या. प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक देवांश परतेकी वर्ग ४ था,चित्रकला स्पर्धा प्रथम क्रमांक कु राजश्री थाडगे वर्ग ६ वा, निबंध स्पर्धा प्रथम क्रमांक कु प्रतीक्षा आईतवाड,द्वितीय क्रमांक कु दुर्गा गोटमवाड,तृतीय क्रमांक कु श्रीदेवी पवार वर्ग ९ वा, वकृत्व स्पर्धा प्रथम क्रमांक आदित्य बाजगीर वर्ग ८ वा तर चावडी वाचन स्पर्धा प्रथम क्रमांक देवांश परतेकी वर्ग ४ था याने प्राप्त केला.
जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी तालुका स्तरावर १० एप्रिल ला पंचायत समिती सभागृह येथे पार पडलेल्या स्पर्धेत पालडोह शाळेने सर्व प्रकारात प्रथम क्रमांक मिळवत आपली गुणवत्ता वारंवार सिद्ध केली आहे.
पालडोह शाळेतील मुलानी मिळवलेले भरीव यशाबद्दल पंचायत समिती चे विस्तार अधिकारी संदीप चौधरी यांनी मुलांचे अभिनंदन केले. शालेय व्यवस्थापन समिती व शाळेतील शिक्षक राठोड,खवशी,आडे,गाकरे, कु इंझळकर व शाळेचे मुख्याध्यापक तथा मार्गदर्शक परतेकी यांनी मुलांचे विशेष अभिनंदन करत जिल्हास्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.



