जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक, वर्धा यांची कुख्यात गुंड व अवैध दारु विक्रेते यांचे विरुध्द बेधडक मोहीम
पोलीस स्टेशन, पुलगाव येथील कुख्यात गुंड व अवैध हातभट्टी दारु विक्रेत्यास एम.पी.डी.ए. कायद्याअंतर्गत मध्यवर्ती कारागृह, अकोला येथे रवानगी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस स्टेशन, पुलगाव हद्दीतील गुंजखेडा, ता. देवळी जि. वर्धा परीसरातील कुख्यात गुंड व दारुविक्रेता नामे पवन दिलीप कातरे, वय २१ वर्ष, राह. गुंजखेडा, पुलगाव ता. देवळी जि. वर्धा याचे विरुध्द पोलीस स्टेशन पुलगाव चे अभिलेखावर शरीराविरुध्द तसेच दारुबंदी अधिनियम अंतर्गत सन २०१८ पासून एकूण १२ गुन्हे नोंद आहे. ज्यामध्ये शिवीगाळ करुन धमको देवून दुखापत करणे, शिवीगाळ करुन गंभीर दुखापत करणे, गावठी मोहा दारुची विक्रो करणे, शस्वासह गृहप्रवेश करन शिवीगाळ व मारण्याची धमकी देवून खंडणी मागणे, साथीदारासह मिळून अडवणुक करुन दुखापत करणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे नोंद आहेत. तो सतत गुन्हे करण्याच्या सवईचा गुन्हेगार होता. संपुर्ण गुन्हे न्यायप्रविष्ट आहेत. मागील २७ वर्षापासुन स्थानबध्द ईसम नामे पवन दिलीप कातर हा गुंजखेडा, पुलगाव ता. देवळो जि. वर्धा परीसरात जनसामान्यांच्या मनामध्ये स्वतःची प्रचंड दहशत निर्माण केली होती. त्याच्या दहशतीमुळे अनेक पिडीत त्याचे विरुध्द पोलीस स्टेशनला तक्रार देण्यास सुध्दा धजावत नव्हते. त्यामुळे परीसरातील सार्वजनीक शांतता व सुव्यवस्था भंग होवुन सार्वजनीक जिवन विस्कळीत झाले होते. पवन दिलीप कातर राह. गुंजखेडा, पुलगाव ता. देवळी जि. वर्धा याच्या कृत्यांमुळे पोलीस स्टेशन पुलगाव अंतर्गत येणाऱ्या परीसरामध्ये सार्वजनीक शांतता व सुव्यवस्था भंग होत असल्याने त्याचेविरुध्द कलम ११० (ई) फौजदारी कायदा, कलम १२९, १६३(२) भारतीय न्याय संहोता अंतर्गत प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आल्या होत्या.
परंतु अशा प्रतीबंधक कार्यवाहीस सुध्दा तो जुमानत नसल्याचे निदर्शनास आले. त्या अनुषंगाने ठाणेदार पुलगाव यांनी महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हाथभट्टीवाले, औषधीद्रव्ये विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, रेती माफीया व जिवनावश्यक वस्तुचा काळाबाजार करणारे यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१ (सुधारणा २०१५) अन्वये स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव मा. वान्मथी सी., जिल्हादंडाधिकारी, वर्धा यांना मा. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे मार्फतीने सादर केला होता. सदरहू स्थानवध्द गुंड प्रवृत्तीचा आणि सातत्याने करीत असलेल्या गुन्ह्यांची मा. वान्मयी जिल्हादंडाधिकारी यांनी गांभीयाने दखल घेवून पवन दिलीप कातरे, वय २९ वर्ष, राह. गुंजखेडा, पुलगाव ता. देवळी जि. वर्धा याचे विरुध्द दिनांक ०२.०४.२०२६ रोजी स्थानबध्द आदेश जारी केल्याने त्यास जिल्हा कारागृह, अकोला येथे स्थानबध्द करण्यात आले आहे. मागील १ वर्षातील कालावधीमध्ये पोलीस विभाग व महसूल विभाग यांचेमधील योग्य समन्वयामुळे एम.पी.डी.ए. कायद्यान्वये धडक कार्यवाही करण्यात आलेली आहे. वर्धा जिल्ह्यातील अवैधरीत्या दारु विक्रेत्यावर, अवैधरीत्या दारुचा विक्री करण्याकरीता पुरवठा करणाऱ्या दारु विक्रेत्यावर तसेच समाजातील गुंड प्रवृत्तीच्या धोकादायक असणाऱ्या व्यक्तीवर, तसेच रेती माफीया अशा गुंड प्रवृतीच्या लोकांच्या मनामध्ये धडकी भरलेली असून गुन्हेगारी विश्वात पुढचा नंबर कुणाचा लागेल या भितीने चांगलीच दहशत निर्माण झालेली असून गुन्हेगारांमध्ये चर्चा रंगल असल्याचे दिसुन येते.
आगामी येणारे सण उत्सव व निवडणुक शांतता पूर्ण बातावरणात पार पाडण्याचे उददेशाने अशा अवैधरीत्या दारु विक्रेत्यावर, अवैधरीत्या दारुचा विक्री करण्याकरीता पुरवठा करणाऱ्या दारु विक्रेत्यावर, समाजातील गुंड प्रवृत्तीच्या धोकादायक असणाऱ्या व्यक्तीवर तसेच रेती माफीया यांचेवर एम.पी.डी.ए. कायदयांर्तगत कठोर कार्यवाहीचे पुनश्चः संकेत मा. जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, वर्धा श्रीमती वान्मयी सी., तसेच मा. पोलीस अधीक्षक वर्धा श्री. सौरभ कुमार अग्रवाल, यांनी दिलेले आहेत.
सन २०२५ मध्ये एकुण १८ दारु विक्रते, गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगारावर तसेच रेती माफीया पांचेवर एम.पी.डी.ए. कायदयांर्तगत जेल मध्ये रवानगी करण्यात आलेली आहे. तसेच सन २०२६ मध्ये एम.पी.डी.ए. कायद्या अंतर्गत ही पाचवी कार्यवाही आहे. अवैध दारू विक्रेते, गुंड प्रवृत्तीच्या धोकादायक व्यक्ती व रेती माफीयांवर कठोर कार्यवाही करण्याचे संकेत मा. पोलीस अधीक्षक, वर्धा श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिलेले आहे. मा. जिल्हाधिकारी, वर्चा व मा. पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे वेधडक मोहीमेमुळे अवैध दारू विक्रेते, गुंड प्रवृत्तीच्या धोकादायक व्यक्ती तसेच रेती माफीया मध्ये प्रचंड दहशत निर्माण झालेली आहे.
सदरची कार्यवाही मा. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, वर्धा. श्री. सदाशिव वाघमारे, अपर पोलीस अधिक्षक, वर्धा श्रीमती वंदना कारखेले, उप विभागीय पोलीस अधिकारी, पुलगाव, पोनी विनोद चौधरी, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांचे मार्गदर्शना खाली पोहवा/अमोल आत्राम, पोहवा आशिष महेशगौरी, नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा. पो.नि. यशवंत सोलसे, पोहवा/विनोद रघाटाटे, पोशि/पंकज टाकोणे, संदीप बोरवन पोलीस स्टेशन, पुलगाच यांनी केली आहे.



