अज्ञात आरोपी निष्पन्न करून 6 लाख 80 हजाराचा मुद्देमाल जप्त
स्थानिक गुन्हे शाखा, वर्धाने बैल चोरीचा गुन्हा उघडकीस

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 30/03/2026 चे 13:41 वा. रोजी फिर्यादी नामे श्री. तुळशीराम पंढरीनाथ गांजुडे, वय 44 वर्ष, रा. आंजी (मोठी)ता. जी.वर्धा यांनी पोलीस स्टेशन खरांगणा येथे येऊन तोंडी रिपोर्ट दिली की फिर्यादी यांचे मौजा आंजी मोठी शेत शिवारातील शेतामध्ये बांधून असलेले पांढऱ्या रंगाचे दोन बैल दिनांक 29/03/2026 चे 19:00 वा. ते 30/03/2026 चे 06.00 वा.दरम्यान कुणीतरी अज्ञात इसमाने चोरी करून नेले अशा फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट वरून पो.स्टे. खरांगणा येथे अप. क्रमांक 183/26 कलम 303(2) बी. एन. एस. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून तपासावर आहे.
सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखा वर्धा हे समांतर तपास करीत असतांना मुखबीर व तांत्रिक बाबीच्या आधारे गुन्ह्यात चोरीस गेलेले बैल व आरोपीचा शोध घेत असता गोपनीय माहिती प्राप्त झाली की मौजा आंजी (मोठी) ह. मु. वर्धा येथे राहणारा रोशन वंजारी हा त्याने पो.स्टे. खरांगणा येथे अप. क्रमांक 183/26 कलम 303(2) बी. एन. एस. मधील चोरी केलेले पांढऱ्या रंगाचे दोन बैल त्याच्या बोलेरो पिकअप MH 40 Y 2048 मालवाहू गाडीमध्ये भरून येळाकेळी कडून वर्धा कडे येत आहे. अशा माहितीवरून दोन पंच व पो. स्टाफसह येळाकेळी ते वर्धा रोडवर इको पार्क जवळ नाकाबंदी करीत असताना मुखबिर कडून मिळालेल्या माहितीप्रमाणे बोलेरो पिकअप MH 40 Y 2048 येताना दिसली. तिला पो. स्टाफ चे मदतीने मोठया शिथाफीने थांबवून बोलेरो पिकअप MH 40 Y 2048 ची पाहणी केली असता सदर गाडीमध्ये आरोपी नावे रोशन गुलाबराव वंजारी, वय 36 वर्षे, रा. वार्ड न. 1 आंजी (मोठी), ता. आर्वी, जिल्हा वर्धा, ह. मु. वर्धा, ता. जि. वर्धा मिळून आला. गाडीची अधिक पाहणी केली असता हिरव्या नेटच्या आत बोलेरो पिकअप चे डाल्या मध्ये दोन पांढऱ्या रंगाचे बैल दिसून आले. सदर आरोपीस बैल व गुन्ह्याबाबत विचारणा केली असता आरोपी याने सांगितले की त्याचे जवळ असलेल्या बोलेरो पिकअप MH 40 Y 2048 या मालवाहु चारचाकी वाहनाने मौजा आंजी (मोठी) शेत शिवारातील फिर्यादी यांचे शेतातून दिनांक 29/03/2026 ते दिनांक 30/03/2026 चे रात्र दरम्यान बैल चोरी केल्याचे सांगितले. सदर आरोपी याने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने पंचासमक्ष आरोपी याचे ताब्यातून 1) दोन पांढऱ्या रंगाचे बैल 70,000/- रु. 2) एक जुने वापरते पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप MH 40 Y 2048 चारचाकी वाहन किंमत 6,00,000/रु. 3) एक अँड्रॉइड मोबाइल किंमत 10,000/- रु. असा एकुण जु. कि. 6,80,000/- रु, चा *मुद्देमाल* जप्ती पंचनाम्याप्रमाणे जप्त करण्यात आला. सदर गुन्ह्यात जप्त करण्यात आलेला मुद्देमाल व आरोपी यास पुढील कारवाई करता पो.स्टे.खरांगणा यांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास पोलीस स्टेशन खरांगणा हे करीत आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल, सा., अपर पोलीस अधिक्षक मा. श्री. सदाशिव वाघमारे सा., स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा चे पोलीस निरीक्षक मा.श्री. विनोद चौधरी सा यांचे निर्देशाप्रमाणे स.पो.नि. आशिषसिंह ठाकूर, स .फौ. मनोज धात्रक, पो.हवा. हमीद शेख, पो.हवा. महादेव सानप, गोविंद मुंढे, पो.अ.विनोद कापसे, म.पो.अ. स्मिता महाजन,सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.



