ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ब्रह्मपुरीत ग्रामपंचायत अर्हेरनवरगाव येथील गैरप्रकारांविरोधात आमरण उपोषण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रह्मपुरी :- तालुक्यातील अर्हेररनवरगाव मध्ये झालेल्य आर्थिक गैरव्यवहार, बनावट कामे आणि नियमबाह्य निर्णयाविरोधात सुरू करण्यात आलेल्या बेमुदत आमरण उपोषणाचा आज चार दिवस सुरू आहे. मागण्या मान्य न झाल्यामुळे संबंधितांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला असून अद्याप प्रशासना करून ठोस प्रतिसाद न मिळाल्यामुळे आंदोलनाची भूमिका घ्यावी लागली. अर्हेरनवरगाव येथील ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत पिलारे व सामाजिक कार्यकर्ता साहिल पिलारे यांनी पंचायत समिती समोर आमरण उपोषण सुरू केलेला आहे. जोपर्यंत आमच्या मागणी मान्य होणार नाही तो पर्यंत सतत आमरण उपोषण सुरू ठेवू असे ठामपणे उपोषणकर्त्यांनी स्थानिक पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहे.

   जिल्हाधिकार्यालय चंद्रपूर येथे सादर करण्यात आलेल्या निवेदनात ग्रामपंचायतमधील विविध गैरप्रकारचा उल्लेख करण्यात आला आहे.यामध्ये नाली बांधकाम , नाली बांधकाम,सोलर दिवे बसवणे, आरओ दुरुस्ती,सार्वजनिक शौचालय बांधकाम तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंग यासारख्या विकास कामांमध्ये अनियमितता असल्याचा आरोप आहे. तसेच सॅनिटरी पॅड खरेदीत आर्थिक व्यवहार झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

याशिवाय कमी किमतीच्या वस्तू जास्त दरात खरेदी करणे, ग्राम निधीचा मनमानी वापर,माहिती अधिकारांतर्गत मागितलेल्या माहितीचा विलंब करणे किंवा अपूर्ण माहिती देणे तसेच मासिक सभेचे ठराव मंजूर नसतानाही कामे मंजूर केल्याचे आरोप करण्यात आले आहे. काही ठिकाणी बनावट नमुने तयार करून मंजुरी घेतल्याचे मुद्दा पुढे आला आहे. उपोषणकर्त्यांनी या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करावे तसेच दोषी आढळल्यास सरपंच व सचिवावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावे.

तसेच 2021 ते 2026 या कालावधीत झालेल्या सर्व कामाची स्वतंत्र व निपक्ष चौकशी करून शासन निधीची वसुली करावी अशी मागणी पत्रकार परिषदेत उपोषणकर्ते ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत (बंडू) पिलारे व सामाजिक कार्यकर्ते साहिल पिलारे यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये