ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरच्या अध्यक्षपदी स्मिता जिवतोडे, सचिवपदी विशाल खांडरे

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरच्या अध्यक्षपदी रोटेरियन स्मिता संजय जिवतोडे यांची, तर विशाल खांडरे यांची सचिवपदी निवड करण्यात आली असून, त्यांच्या नेतृत्वाखालील नवीन कार्यकारिणी सेवाभिमुख उपक्रमांना प्रारंभ करणार आहे.

नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा शनिवार, ११ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता चंद्रलोक क्रिएशन्स येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात नव्या पदाधिकाऱ्यांकडे अधिकृतपणे पदभार सोपविण्यात येणार असून, ‘राजपर्व २०२६-२७’ या आगामी रोटरी वर्षातील विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि जनहिताच्या उपक्रमांची रूपरेषाही जाहीर करण्यात येणार आहे.

या पदग्रहण सोहळ्यास ३०३० चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर-इलेक्ट रोटेरियन किशोर राठी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच असिस्टंट गव्हर्नर रोटेरियन अनुप यादव हे विशेष अतिथी, तर चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे हे मान्यवर अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरने मागील ५० वर्षापेक्षा अधिक काळापासून शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संवर्धन, रक्तदान, महिला व बालकल्याण तसेच विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजसेवेची परंपरा जोपासली आहे.

नव्या कार्यकारिणीच्या नेतृत्वाखाली ही सेवायात्रा अधिक व्यापक करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे. या पदग्रहण सोहळ्यास रोटरी सदस्य, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, मान्यवर नागरिक तसेच समाजसेवेत रुची असलेल्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये