सेवापुर्ती सत्कार सोहळा संपन्न
विद्यार्थी, शिक्षक वृंद व मान्यवारांची उपस्थिति

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
पिएमश्री जि. प. उ. प्रा. शाळा,चंदनखेडा च्या मुख्याध्यापिका सौ. अनिता प्रकाश आईंचवार मँडम ह्या दि.३० जुन २०२६ ला सेवानिवृत्त झाल्या. त्यांचा सत्कार सोहळा दि.६ जुलै २०२६ ला चंदनखेडा येथील ग्रा.पं.सभागृहात पार पडला.
ह्या सोहळ्याचे आयोजन त्यांच्या सेवाकाळातील विद्यमान शिक्षकवृंद व शा. व्य. स. चंदनखेडा यांचे वतीने करण्यात आले होते. हा “सत्कार सोहळा” मान्यवर पदाधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी यांचे उपस्थितीत संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल कोकुडे शा.व्य.स. अध्यक्ष होते तर प्रमुख अतिथी म्हणुन कैलास उरकुडे कें.प्र. वायगांव, सत्कारमुर्ती आदरणीय सौ.अनिता आईंचवार मँडम, प्रकाश आईंचवार, शाळेचे प्र.मु.अ. सुखदेव मेश्राम, राजेश कोहळे विषेश शिक्षक, सौ.प्रतिभा गुंडमवार, से.नि.शिक्षिका, पंडीत लोंढे वि.शि.नंदोरी(बु), राजेश गायकवाड सर,ज्येष्ठ शिक्षक यासोबत ह्या कार्यक्रयला शाळा व्य,स.चे समस्त सदस्यगण विद्यार्थी, ग्रामस्थ, अंगणवाडी शिक्षिका यांचे उपस्थितीत सत्कार समारंभ पार पडला.
ह्यावेळी मान्यवरांचे हस्ते शिक्षकवृदांचे वतीने सौ.अनिता आईचवार मँडम यांचा मानवस्त्र, पुष्पहार श्रीफळ व सन्मानपत्र प्रदान करुन सत्कार करण्यात आला.
शाळेच्या मावळत्या मुख्याध्यापिका सौ.आईंचवार मँडम यांच्याबद्दल मनोगतात सर्वांनीच त्यांच्या प्रशासकीय नेतृत्वशैलीचे कौतुक केले ,पिएमश्री जि.प.उ.प्रा. शाळा, चंदनखेडा या शाळेला जिल्ह्यात आगळी ओळख करुन देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला.आपल्या आगळ्या कार्यशैलीत सहपाठी सर्व शिक्षकांकडुन समन्वयाने काम करण्याचा त्यांचा हातखंड वाखाणण्याजोगा होता. ग्रामस्थ-पालक- पदाधिकारी-अधिकारी यांचा समन्वय साधुन केलेले कार्य तसेच त्यांनी आपल्या प्रेमळ,मृदुभाषी स्वभावाच्या कार्यशैलीने त्यांनी चंदनखेडा शाळेला दिलेली शैक्षणिक प्रशासकीय नेतृत्वाची ओळख चंदनखेडा येथे सुवर्णाक्षरी इतिहासात जमा नक्कीच होईल.असे त्यांचे कार्य खरं तर अनेकांना प्रेरणास्थानी राहील. कर्तव्यदक्ष, कार्यतत्पर,मृदु व मितभाषी स्वभावाच्या नेतृत्वाला निरोप देण्यासाठी त्यांच्या या सेवापुर्ती सोहळ्याला अनेक ग्रामस्थ हजर होते.ह्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.सुखदेव मेश्राम प्र.मु.अ. यांनी तर सुत्रसंचलन सौ.कविता हनवते मँडम तसेच आभार प्रदर्शन कु.मंगला ढोक/दडमल ह्यांनी मानले.
शेवटी ढोल ताशाच्या गजरात पुष्पवृष्टी करीत सौ.अनिता आईंचवार मँडम व सोबत असलेल्या त्याच्या परिवार सदस्यांनासह विद्यार्थ्यांनी जड अंतकरणातून निरोप दिला, त्यांना त्यांचे पुढील आयुष्य निरोगी,निरामय,दिर्घायुष्यी लाभतील या कामणेसह त्यांना सेवापुर्तीच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या.



