ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तहसीलदार राजेश भांडारकर व नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांचे विरुद्ध ॲट्रॉसिटीसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे 

   भद्रावती तहसील कार्यालयातील तत्कालीन कामकाजासंदर्भात गंभीर आरोप करत मोरवा येथील श्रीमती वंदना परमेश्वर मेश्राम (वय ४०) यांनी भद्रावती पोलीस ठाण्यात दिलेल्या लेखी तक्रारीवरून तत्कालीन तहसीलदार राजेश भांडारकर व नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, मृतक परमेश्वर मेश्राम यांच्या मौजा कुरोडा येथील सर्वे क्रमांक ८६ व ८७ या शेतीचा फेरफार कोणताही स्थगिती आदेश (स्टे) नसतानाही करण्यात आला नाही. याबाबत विचारणा करण्यासाठी ते २६ सप्टेंबर २०२५ रोजी तहसील कार्यालयात गेले असता, तहसीलदार राजेश भांडारकर व नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांनी त्यांना कथितरित्या जातीवाचक शिवीगाळ करून कार्यालयाबाहेर ढकलल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकारामुळे मानसिक धक्का बसल्याने परमेश्वर मेश्राम यांनी तहसील कार्यालयातच विषारी औषध प्राशन केले. उपचारादरम्यान ६ ऑक्टोबर २०२५ रोजी त्यांचा मृत्यू झाला. संबंधित अधिकाऱ्यांच्या वागणुकीमुळेच पतीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप श्रीमती वंदना मेश्राम यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.

या तक्रारीच्या आधारे भद्रावती पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ६६९/२०२६ नोंद करण्यात आला असून आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०८, ३(५) तसेच अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा कलम ३(१)(आर), ३(१)(एस) व ३(२)(व्ही) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये