ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावती येथे विषप्राशनाचा संशय

नागपूर येथील ५८वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        भद्रावती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोयना गेट परिसरातील इराई ट्रोल रिसॉर्ट येथे नागपूर येथील शिवसिंग राजभानसिंग सोलंकी (वय ५८) यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, मयत शिवसिंग सोलंकी यांच्यावर सुमारे तीन महिन्यांपूर्वी हृदयाची शस्त्रक्रिया (हार्ट ऑपरेशन) झाली होती. त्यांनी विषप्राशन केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.

मयताचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय, भद्रावती येथे ठेवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये