ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोलू उर्फ विनोद गेडाम यांची शिवसेना ऊबाठा उपतालुकाप्रमुख पदी नियुक्ती

भद्रावतीत मशाल शिवसेनेचा प्रभाव वाढणार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

            शिवसेना पक्षप्रमुख माननीय ऊद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आदेशानुसार, चंद्रपुर जिल्हाप्रमुख भास्कर ताजणे यांचे मार्गदर्शनाखाली भद्रावती उपतालुका प्रमुख पदी भद्रावती भद्रनाग वार्ड चे डॅशींग शिवसैनिक गोलू उर्फ विनोद गेडाम यांची नियुक्ति करन्यात आली आहे. सदर नियुक्तिचे नियुक्ति पत्र तालुका प्रमुख नरेश काळे, शहर प्रमुख बंटी उर्फ अश्विन हेमके, जेष्ठ शिवसैनिक व शहर संघटक बंडु उर्फ नागेन्द्र चटपल्लीवार व निष्ठावान शिवसैनिक पुरुषोत्तम नैताम यांचे हस्ते बहाल करन्यात आले.

    गोलू गेडाम यांचे बरोबर शहरातील व तालुक्यातील अनेक शिवसैनिकांनी शिवबंधन बांधुन स्वेच्छेने ऊद्धव शिवसेनेत प्रवेश केला.

यामुळे तालुक्यात व शहरात शिवसेना ऊद्धव बाळासाहेब ठाकरे आक्रमक होनार आहे. जनतेच्या समस्यांना रस्त्यावर उतरुन मार्गी लावन्याचा शिवसैनिकांचा संकल्प आहे. ज्या युवकांना जनतेप्रती सहानुभूति आहे,त्यांनी ईतर कोनत्याही पक्षात न जाता फक्त शिवसेना ऊद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातच सामिल व्हावे.भद्रावती हा गेल्या ३० वर्षापासुन शिवसेना ऊद्धव बाळासाहेब ठाकरेंचा बालेकिल्ला राहीलेला आहे. या वेळेस चिन्हाचा घोळ झाल्यामुळे जनता नकली सेनेला असली शिवसेना समजुन बसली.हा संभ्रम लवकरच शिवसैनिक घरोघरी जावून “मशाल” वाली शिवसेनाच असली शिवसेना आहे हे पटवून देनार आहे.

भद्रावतीत येनारा काळ हा ऊद्धव बाळासाहेब ठाकरेंचाच असनार आहे.

   गेल्या ३० वर्षात ज्यांनी शहरात शिवसेना वाढीसाठी योगदान दिले,ते शिवसैनिक अजुनही लाभापासुन वंचित आहे.ज्यांचे शिवसेना वाढीसाठी काही योगदान नाही,ते मात्र लाभार्थी बनले आहेत.पण सत्य कितीही लपविले तरी जास्त काळ लपुन राहु शकत नाही.असा विश्वास जुन्या निष्ठावंत शिवसैनिकांना वाटत असल्याचे शिवसैनिकांनी उघडपणे बोलुन दाखविले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये